TRENDING:

Morning Routine : दररोज करा ही 5 योगासन, किडनी आणि लिव्हर राहतील उत्तम

Last Updated:

किडनी आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी योग हा एक सर्वांगीण उपाय म्हणून उदयास येत आहे. योगामुळे डिटॉक्सिफिकेशन आणि एकूणच आरोग्यामध्ये संभाव्य फायदे मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्या दैनंदिन शारीरिक प्रक्रियांचे कार्य योग्यपणे सुनिश्चित करण्यात लिव्हर आणि किडनीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. डिटॉक्सिफिकेशन, चयापचय आणि प्रथिने संश्लेषण यासह 500 हून अधिक कामं लिव्हर करतं. त्यामुळे त्याला विविध अॅक्टिव्हिटींचं पॉवरहाउस म्हटलं जातं. एकूणच आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी व्यक्तीचं लिव्हर आणि किडनी निरोगी असणं आवश्यक आहे. किडनी आणि यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी योग हा एक सर्वांगीण उपाय म्हणून उदयास येत आहे. योगामुळे डिटॉक्सिफिकेशन आणि एकूणच आरोग्यामध्ये संभाव्य फायदे मिळतात. ही प्राचीन पद्धत मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद वाढविण्यासाठी शारीरिक मुद्रा, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि ध्यान यांचा मेळ घालते.
दररोज करा ही 5 योगासन, किडनी आणि लिव्हर राहतील उत्तम
दररोज करा ही 5 योगासन, किडनी आणि लिव्हर राहतील उत्तम
advertisement

पचन आणि एकूणच आरोग्याच्या बाबतीत, कार्यक्षमता राखण्यात यकृत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. योग यकृताला डिटॉक्सिफिकेशन आणि टारगेटेड पोश्चरद्वारे उत्तेजित करण्याचं एक शक्तिशाली साधन प्रदान करतो. दुसरीकडे, किडनी आपल्या शरीरातील द्रव पातळी व्यवस्थापित करते, कचरा फिल्टर करते, रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, रक्तदाब नियंत्रित करते आणि मजबूत हाडांसाठी व्हिटॅमिन डी सक्रिय करण्याची प्रक्रिया सुलभ करते.

advertisement

किडनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यानं क्रॉनिक किडनी डिसिज (सीकेडी) होऊ शकतो. ज्यामध्ये शरीरात टाकाऊ घटक आणि जास्त पाणी साठून राहतं. ज्यामुळे आरोग्यात गुंतागुंत होऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणं, तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर बंद करणे यासारखे सक्रिय उपाय केल्याने किडनीचं आरोग्य लक्षणीयरीत्या सुरक्षित होऊ शकते.

अक्षर योग केंद्राचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू हिमालयन सिद्ध अक्षर यांनी योगाद्वारे किडनी आणि लिव्हर कसं डिटॉक्स करायचं याची माहिती दिली आहे.

advertisement

रक्तातील साखरेचं व्यवस्थापन: डायबेटिस आणि हाय ब्लड प्रेशर या किडनीचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या प्राथमिक बाबी आहेत. व्यायाम, योग्य पोषण हे घटक हृदयाच्या आरोग्यावर आणि वजन व्यवस्थापनावर सकारात्मक परिणाम करतात. योगाचा सर्वांगीण सराव करून निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास किडनीच्या कार्यासाठी विशेष फायदा होऊ शकतो.

आसन आणि प्राणायाम: धकाधकीचं काम, अपुरी झोप आणि झोपेची खराब गुणवत्ता या गोष्टी एकत्रितपणे तणावात योगदान देतात व शेवटी किडनी कमकुवत करतात. योगाचा ताण व्यवस्थापनावर थेट प्रभाव पडतो. शांततेची भावना वाढवते आणि तणावपूर्ण परिस्थितीत प्रभावीपणे नेव्हिगेट करण्याची क्षमता वाढवते.

advertisement

अनुलोम विलोम प्राणायाम: आपल्या अंगठ्यानं आपली उजवी नाकपुडी हळूवारपणे बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि ती बंद करा. तो श्वास उजव्या बाजूने सोडा. पुन्हा उजवीकडून श्वास घेऊन नाकपुडी बंद करा आणि डाव्या बाजूनं श्वास सोडा. अशा प्रकारे चक्र पूर्ण करा.

1) धनुरासन :

advertisement

- पोटावर झोपून सुरुवात करा.

- तुमचे गुडघे वाकवा आणि तुमचे हाताचे तळवे वापरून तुमचे घोटे पकडा.

- एक मजबूत पकड घ्या.

- आपले पाय आणि हात त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत लांबवण्याचा प्रयत्न करा.

- काही काळासाठी हाच पवित्रा राखून, तुमची नजर वरच्या दिशेने न्या.

2) पदांगुष्ठासन :

- समस्तिथीमध्ये सुरुवात करा, पाय जोडा.

- श्वास सोडा आणि हळूवारपणे पुढच्या बाजूस झुका, तुमचे खांदे आणि मान शिथिल ठेवून तुमचं डोकं खाली येऊ द्या.

- कंबरेच्या ऐवजी नितंबाच्या सांध्यावर तुमचे धड पेलून धरण्याचा प्रयत्न करा.

- पायाचे अंगठे पकडा, श्वास घ्या आणि तुम्ही तुमचे हात लांबवत असताना तुमची नजर वर करा.

- श्वास बाहेर सोडा.

- आपले पाय आणि गुडघे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा; नवशिक्या व्यक्ती त्यांचे गुडघे किंचित वाकवू शकतात.

- हळूहळू गुडघे सरळ करा.

- पुन्हा आसन करा.

3) कंधारासन :

- उताणे पडून सुरू करा.

- गुडघे वाकवून पायाचे तळवे जमिनीवर ठेवा.

- आपले पाय आपल्या नितंबांकडे खेचा.

- आपले हात आपल्या शरीराच्या बाजूने जमिनीवर पसरवा.

- तुमच्या हाताच्या तळव्यानं घोटे पकडा.

- हळूहळू तुमचे नितंब आणि पाठ जमिनीवरून वर उचला.

- तुमच्या हनुवटीला तुमच्या छातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट ठेवून मागच्या बाजूला एक सौम्य कमान तयार करा.

- आपली दृष्टी आकाशाकडे केंद्रित करा.

4) नौकासन  :

- उताणे झोपा.

- तुमची बसलेली हाडे संतुलित करण्यासाठी तुमची अप्पर आणि लोअर बॉडी उचला.

- आपल्या पायाची बोटं आणि डोळे एका रेषेत आणा.

- गुडघे आणि पाठ सरळ ठेवा.

- हात जमिनीला समांतर ठेवून पुढच्या बाजूला लांबवा.

- ओटीपोटातील स्नायू ताणा.

- तुमची पाठ सरळ ठेवा.

- सामान्यपणे श्वास घ्या.

5) मलासन:

- सरळ उभे राहा, हात शरीराच्या बाजूला ठेवा.

- गुडघे वाकवा, नितंबांचा भार टाचांवर द्या.

- पाय जमिनीवर सपाट राहतील याची खात्री करा.

- हाताचे तळवे जमिनीवर तुमच्या पायाजवळ ठेवा किंवा प्रार्थनेच्या हावभावात त्यांना छातीशी चिकटवा.

- पाठीचा कणा ताठ ठेवा.

या योगासनांना पूरक आहार घेतल्यास लिव्हर आणि किडनीचं आरोग्य सुधरू शकतं. आहारातील फायबरचं प्रमाण वाढवा, कॅफिनऐवजी ग्रीन टी प्या, आणि व्हिटॅमिन सीचं पुरेसे सेवन करा. हळद, आणि काजू यांचा आहारात समावेश करणं व पालेभाज्यांचा वापर वाढवणे हे आरोग्य सुधारण्यास हातभार लावेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Morning Routine : दररोज करा ही 5 योगासन, किडनी आणि लिव्हर राहतील उत्तम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल