संपूर्ण भारतात पांढरा भात मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो. आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्यानुसार पांढऱ्या भातात ब्राऊन आणि लाल भाताच्या मानाने खूप कमी प्रमाणात फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात. याउलट या भातामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमालीचे वाढते. जर तुम्ही रोज भात खात असाल तर पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन किंवा लाल भाताचे सेवन सुरू करावे. कारण यामध्ये अधिक फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळतात.
advertisement
कंडोम वापरण्यात या देशातील पुरुष अव्वल, तर भारताचा नंबर... पाहा जगभरात कंडोम वापरण्याचं प्रमाण किती?
WHO च्या मते, दररोज २००-३०० ग्रॅम भात खाणे योग्य आहे. तर आयसीएमआरच्या मते दररोज २५०-३०० ग्रॅम भात खाऊ शकतो. मात्र अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) यांच्या सांगण्यानुसार दररोज केवळ १००-१५० ग्रॅमच भात खाणे चांगले. भारतात तांदळाच्या अनेक प्रजाती आहेत. बासमती तांदूळ हे सर्वात लांब आणि सुगंधित तांदूळ आहे जे बिर्याणी आणि पुलाव सारख्या अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. दक्षिण भारतात सोना मसूरी आणि पोन्नी भात सर्वाधिक खाल्ले जातात. सोना मसूरी आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात पिकते. पोन्नी तांदूळ हलका असतो आणि इडली आणि डोसा बनवण्यासाठी वापरला जातो.
लाल तांदूळ केरळ, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यांमध्ये आढळतो. हा तांदूळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि पारंपारिक पदार्थांमध्ये वापरला जातो. याशिवाय भारतात काळा तांदूळही आहे, जो मणिपूरमध्ये पिकवला जातो. येथील लोक त्याला ''चखाओ'' म्हणतात. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तर ब्राऊन राइसमध्ये किंचित जास्त कॅलरी असतात. तथापि, त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असल्यामुळे दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
