कंडोम वापरण्यात या देशातील पुरुष अव्वल, तर भारताचा नंबर... पाहा जगभरात कंडोम वापरण्याचं प्रमाण किती?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
गर्भनिरोधक, तसंच लैंगिक आजारांना आळा घालण्याचं साधन म्हणून आज कंडोमचा वापर बऱ्याच अंशी वाढला आहे.
जगाची वाढत चाललेली लोकसंख्या ही एके काळी डोकेदुखी बनू शकेल असं स्पष्ट दिसू लागलं, तेव्हा कंडोमसारख्या गर्भनिरोधक साधनांचा उदय झाला आणि चित्र हळूहळू पालटू लागलं. गर्भनिरोधक, तसंच लैंगिक आजारांना आळा घालण्याचं साधन म्हणून आज कंडोमचा वापर बऱ्याच अंशी वाढला आहे. तरीही हे चित्र समाधानकारक नाही. कंडोमच्या वापराबद्दलची आकडेवारी काही वेगळंच सांगते. ‘एबीपी’ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात अद्याप कंडोम वापराचं प्रमाण अपेक्षित प्रमाणाएवढं नाही. खरं तर लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीचा हा सर्वांत सोपा उपाय आहे. तसंच लैंगिक व जननेंद्रियांच्या अनेक आजारांनाही यामुळे प्रतिबंध होऊ शकतो. एड्ससारख्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञ कंडोम वापरण्याचा सल्ला देतात. इतके फायदे असूनही अनेक जण कंडोमचा वापर करण्यास फारसे धजावत नाहीत.
advertisement
जगभरात कंडोमच्या वापराबद्दल जागृती केली जात आहे. यामुळे कसे फायदे होऊ शकतात, याचा प्रचार केला जातो आहे. असं असूनही जगाच्या विविध भागांतले अनेक जण कंडोम वापराबद्दल मनात अढी ठेवून आहेत. कंडोमचा वापर योग्य नसल्याचं त्यांना वाटतं.
जगभरात कंडोम वापरण्याचं प्रमाण किती?
कंडोम अलायन्सच्या रिपोर्टमधल्या माहितीनुसार, 1994 मध्ये जगातले केवळ 6.4 कोटी जण कंडोमचा वापर करत होते; मात्र 2021 मध्ये यात वाढ होऊन कंडोम वापरणाऱ्यांची संख्या 19 कोटींपर्यंत गेली आहे. अर्थात जगातल्या प्रौढांची एकूण लोकसंख्या पाहता ही आकडेवारी निश्चितच कमी आहे; मात्र हळूहळू का असेना याबद्दल समाजात जागरूकता निर्माण होत आहे, हे सकारात्मक आहे.
advertisement
खरं तर गर्भधारणा रोखण्याचा उपाय म्हणून पुरुषांच्या तुलनेत महिला कंडोमवर अधिक विश्वास ठेवतात. रिपोर्टमधल्या माहितीनुसार, जगातल्या 33 टक्के महिला अवांछित गर्भधारणा होऊ नये म्हणून कंडोमचा वापर करतात. स्टेटिस्टाच्या सर्व्हेनुसार, ब्राझीलमध्ये कंडोमचा सर्वाधिक वापर केला जातो. तिथे 65 टक्के नागरिक कंडोम वापरतात, तर कंडोमच्या विक्रीमध्ये चीन सर्वांत आघाडीवर आहे.
एका दिवसात किती बिअर पिऊ शकतो? डॉक्टरांनीच सांगितलं योग्य प्रमाण
भारतासारख्या भरपूर लोकसंख्या असलेल्या देशात मात्र कंडोम वापरणाऱ्यांची संख्या म्हणावी तेवढी नाही. भारतीय व्यक्ती कंडोमचा वापर करण्यालाच नव्हे, तर त्याविषयी बोलण्यासही कचरतात. मानसिकता यात महत्त्वाची भूमिका बजावते. सेक्स करताना कंडोमचा वापर केला तर शारीरिक सुख कमी मिळेल असं पुरुषांना वाटतं, असं निरीक्षण एका सर्वेक्षणात नोंदवलं गेलं होतं. त्यामुळेच अनेक विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती कंडोमचा वापर करण्याचं टाळतात.
advertisement
कंडोम वापरल्यास प्लेबॉय असा शिक्का बसेल, असं पहिल्यांदा सेक्स करणाऱ्या अनेक पुरुषांना वाटतं. तसंच महिलाही सेक्स करताना पुरुष जोडीदाराला कंडोमचा वापर करण्याबाबत विचारणा करण्यास धजावत नाहीत. थोडक्यात, कंडोमबाबत समाजात जागरूकता होत असली, तरी अद्याप अनेक जण कंडोमचा वापर करत नाहीत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2024 2:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कंडोम वापरण्यात या देशातील पुरुष अव्वल, तर भारताचा नंबर... पाहा जगभरात कंडोम वापरण्याचं प्रमाण किती?


