केसांसाठीच्या ट्रिटमेंटनी काही वेळा तात्कालिक परिणाम दिसून येतात. केसांच्या समस्येचं एक प्रमुख कारण शरीरात आवश्यक पोषक घटकांचा अभाव हे देखील असू शकतं. योग्य पोषणाशिवाय केसांची मुळं कमकुवत होतात आणि नवीन केसांची वाढ मंदावते. त्यामुळे केस गळतात किंवा खूप हळू वाढतात. म्हणजेच महाग ट्रिटमेंट करण्याआधी तुमच्या ताटातले सर्व पौष्टिक जिन्नस पोटात व्यवस्थित जातात की नाही हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.
advertisement
Declutter : नवीन वर्षात आरोग्य शत्रूंना दाखवा बाहेरचा रस्ता, आजारांना दूर पळवा
केसांच्या वाढीसाठी लोह हे एक आवश्यक खनिज आहे. ते टाळूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत करतं. शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा केसांच्या कुपांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे केस कमकुवत होतात आणि गळतात, ज्यामुळे नवीन केसांची वाढ मंदावते. महिलांमधे लोहाची कमतरता अधिक जाणवते. पालक, बीट, डाळिंब, डाळी आणि गूळ हे लोहाचे चांगले स्रोत आहेत.
बायोटिनची कमतरता - बायोटिन, ज्याला व्हिटॅमिन बी7 असंही म्हणतात, याला हेअर प्रोटिन मानलं जातं. यामुळे केराटिन प्रथिन तयार करण्यास मदत होते, केसांची मजबुती आणि वाढीसाठी हा घटक आवश्यक आहे. बायोटिनच्या कमतरतेमुळे केस कोरडे, ठिसूळ होतात तसंच सहज तुटू शकतात. अंडी, काजू, बिया, केळी आणि रताळ्यात बायोटिन असतं.
प्रथिनांची कमतरता - केस प्रामुख्यानं केराटिन प्रथिनांपासून बनलेले असतात. म्हणून, आहारात प्रथिनांची कमतरता थेट केसांच्या वाढीवर परिणाम करते. शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिनं मिळाली नाहीत तर ते आवश्यक अवयवांना प्राधान्य देतं आणि केसांच्या वाढीकडे दुर्लक्ष करतं, ज्यामुळे केसांची वाढ थांबण्याची समस्या उद्भवते.
डाळी, चीज, दूध, दही, अंडी आणि सोया उत्पादनं प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.
Uric Acid : युरिक अॅसिड वाढू नये म्हणून हे उपाय करुन पाहा, हे पदार्थ खाऊ नका
व्हिटॅमिन डीची कमतरता - केसांच्या कुपांना सक्रिय करण्यात व्हिटॅमिन डीची भूमिका महत्त्वाची आहे. या कमतरतेमुळे केसांचे कूप कमकुवत होतात आणि नवीन केसांची वाढ मंदावते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली ही याची प्रमुख कारणं आहेत. सकाळी सूर्यप्रकाश, मशरूम, फोर्टिफाइड दूध आणि अंड्यातील पिवळ बलक यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन निघते.
झिंकची कमतरता - झिंक हे केसांच्या ऊतींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेलं खनिज आहे. तेल ग्रंथींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी याचा उपयोग होतो. झिंकच्या कमतरतेमुळे केस गळती वाढू शकते आणि केसांची वाढ खुंटू शकते. भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, सर्व धान्य आणि डाळी हे झिंकचे चांगले स्रोत आहेत.
