उज्जैन : अनेकदा असे दिसून येते की, महिला आणि पुरुष दोघेही त्यांच्या पर्समध्ये पैशांव्यतिरिक्त अनेक गोष्टी ठेवतात. या अनेक गोष्टींची त्यांना विशेष गरज नसते. तरीही ते या वस्तू आपल्या पर्समध्ये ठेवतात. मात्र, यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्रात याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जर त्यांचे पालन केले तर व्यक्ती जीवनातील अनेक समस्या सोडवू शकतो. पण जे लोक वास्तुशास्त्रात सांगितलेल्या गोष्टींच्या विरुद्ध गोष्टी करतात, त्यांना आरोग्यापासून ते पैशापर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
advertisement
पंडित भोला शास्त्री यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. वास्तुशास्त्रातील अनेक नियमांचे पालन करून घरात सकारात्मक वातावरण निर्माण करता येते. या नियमांचे पालन करून काम केल्यास आर्थिक फायदा होतो. त्याचबरोबर वास्तूनुसार नियमांचे पालन केले नाही किंवा त्या गोष्टी पाळल्या नाहीत तर धनाचीही हानी होते. त्या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात.
पर्समध्ये चाव्या ठेवू नका -
आपल्याजवळ पर्स किंवा पाकिट ठेवण्यापूर्वी त्यात कोणतीही चावी ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चाव्या ठेवणे फारच अशुभ आहे. असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
पर्समध्ये पूर्वज आणि देवांचे फोटो ठेवू नका -
वास्तु शास्त्रानुसार, पर्समध्ये पूर्वज आणि देवतांचे फोटो ठेवणेसुद्धा चुकीचे आहे. असे केल्याने आर्थिक हानी होते. हिंदू धर्मात पूर्वजांना देवांच्या समान मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांना पर्समध्ये ठेवणे हा त्यांचा अपमान आहे. आपल्या पूर्वजांचे फोटो योग्य ठिकाणी लावून त्यांचा सन्मान करा.
पर्समध्ये फाटलेले जुने बिल ठेवू नका -
पर्समध्ये चुकूनही जुनी बिले ठेवू नका. असे केल्याने तुमचे पैसे कमी होऊ लागतील. वास्तु शास्त्रामध्ये असे न करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही जुनी बिले ठेवली तर तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित येते.
डिंपल झाली दिपराज, भजन गायिकेचा मोठा निर्णय, तुम्हालाही धक्का बसेल, पाहा photos
पर्समध्ये औषधी ठेवू नका -
अनेकदा लोक त्यांना गरजेच्या वेळी औषधे घेता येतील म्हणून काही औषधे पर्समध्ये ठेवून फिरतात. मात्र औषधे पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक उर्जेला चालना मिळते. अशा परिस्थितीत पर्समध्ये औषधे ठेवणे टाळावे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती राशिचक्र, धर्म आणि शास्त्राच्या आधारे ज्योतिषी आणि आचार्यांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
