TRENDING:

लवंग आणि लसूण या पदार्थांचे आश्चर्यकारक औषधी गुणधर्म माहिती आहेत का?

Last Updated:

तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊ या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. त्यामुळेच थंडीच्या काळात बहुतांश व्यक्तींना सर्दी, खोकला, घशाची खवखव अशा वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्या जाणवतात. या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधंही घेतली जातात; मात्र किरकोळ आजारांवर सतत औषधं घेतली, तर त्याचे साइड इफेक्ट्सही होऊ शकतात. म्हणूनच अशा किरकोळ समस्यांवर घरगुती उपाय करणं चांगलं. तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊ या.
लवंग
लवंग
advertisement

न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या मते वर उल्लेख केलेल्या किरकोळ आरोग्य समस्या लसूण आणि लवंग या दोन मसाला पदार्थांच्या वापराने दूर करता येऊ शकतात. मसाल्याचे हे दोन पदार्थ हमखास सर्व घरांत असतातच आणि त्यात औषधी गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक विकारांमध्ये त्यांचा वापर केला जातो. लसूण आणि लवंग यांचा अधिक प्रभावी वापर होण्यासाठी हे पदार्थ भाजून घेतले पाहिजेत. कारण या प्रक्रियेनंतर त्या पदार्थांचा प्रभाव अधिक वाढतो.

advertisement

भाजलेली लसूण कोलेस्टेरॉलचा स्तर कमी करण्यास, तसंच रक्तदाब नियंत्रित वा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपलं जातं. लसूण अ‍ॅलिसिन आणि अन्य घटकांनी युक्त असते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपलं जातं. भाजलेल्या लसूण पाकळ्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.

भाजलेली लसूण अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असते. त्यामुळे शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते. तसंच जुनाट विकारांचा धोकाही कमी होतो. कॅन्सरशी दोन हात करण्याचे गुणधर्म लसणीमध्ये असतात. त्यातले काही घटक कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्यास मदत करतात, तर काही घटक कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करू शकतात.

advertisement

श्वसनाशी संबंधित समस्या कमी करण्यासाठीही लसूण उपयुक्त ठरते. भाजलेल्या लसूण पाकळ्या सर्दी आणि श्वसनाशी संबंधित संसर्ग कमी करण्यात मदत करू शकतात.

भाजलेल्या लवंगा म्हणजे पोषक तत्त्वांचं भांडारच

भाजलेल्या लवंगांमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि फायबर्ससह अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हे घटक हाडांचं आरोग्य, प्रतिकारशक्ती, तसंच पचनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. लवंगांमध्ये युजेनॉल आणि अन्य बायोअ‍ॅक्टिव्ह घटक आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. शरीरातल्या फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स काम करतात. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि जुनाट विकारांची जोखीम कमी करण्यासाठीही या घटकांचा उपयोग होतो.

advertisement

लवंगांमधले गुणधर्म खोकला कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. लवंगा भाजून खाल्ल्या, तर सुका खोकला लवकर कमी होतो. शरीरातली सूजही कमी होते.

लवंगांचा उपयोग दातांच्या वेदना कमी करण्यासाठी पारंपरिकरीत्या केला जातो. खासकरून युजेनॉलमध्ये विशेष गुणधर्म असतात. ते दातदुखी, डोकेदुखीमध्ये दिलासा देतात. अँटीबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म असल्याने तोंडाच्या आरोग्यासाठी त्याचा वापर केला जातो. भाजलेल्या लवंगा चावल्या किंवा लवंगांचं तेल वापरलं, तर श्वासाचा दुर्गंध, दातदुखी, हिरड्यांचा संसर्ग कमी होतो.

advertisement

लवंगा पचनासाठीच्या विकरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. अपचन, सूज, गॅसेस कमी करण्यासाठीही लवंग मदत करते. लवंगांमधले घटक ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठीही मदत करतात. त्यामुळे डायबेटीसग्रस्तांना हा चांगला उपाय ठरतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लवंग आणि लसूण या पदार्थांचे आश्चर्यकारक औषधी गुणधर्म माहिती आहेत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल