TRENDING:

Food Combination : मासे आणि दही एकत्र खाऊ नये? त्वचेच्या पांढऱ्या डागांशी काय संबंध? डॉक्टरांनी सांगितलं फॅक्ट

Last Updated:

Does curd and fish combination cause white patches : काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे अशा पदार्थांबाबत थोडी सावधगिरी बाळगणं महत्त्वचं ठरतं. अशाच दोन पदार्थांविषयी आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत जे सोबत खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात पंचपक्वान्न आणि साग्रसंगीत आहाराची परंपरा आहे. एकाचवेळी जेवणात वेगवेगळे आणि चवदार पदार्थ असल्याशिवाय अनेकांना जेवण्यात मजा येत नाही. अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावर देखील थाळीमध्ये असेच अंबट, गोड तिखट आणि मसालेदार पदार्थ असतात. खरंतर अशा जेवणाचे अनेकजण फार शौकीन असतात. पंरतु काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे अशा पदार्थांबाबत थोडी सावधगिरी बाळगणं महत्त्वचं ठरतं. अशाच दोन पदार्थांविषयी आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत जे सोबत खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
त्वचेवर पांढरे डाग पडण्याचे कारण..
त्वचेवर पांढरे डाग पडण्याचे कारण..
advertisement

मासे-दूध एकत्र खावे की नाही?

तुम्ही अनेकदा आजी-आजोबा, आई-वडील, नातेवाईक किंवा मोठ्यांकडून ऐकलं असेल की मासे खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये किंवा दुधापासून बनलेले कोणतेही पदार्थ खाणे टाळावे. असं केल्यास त्वचेवर पांढरे डाग येऊ शकतात असा तर्क दिला जातो. घरातील वडीलधारी लोक अनेकदा ही दोन्ही पदार्थ एकत्र खाणं टाळण्याचा सल्ला देतात. परंतु या दाव्याला काही वैज्ञानिक आधार आहे का? की हा फक्त एक समज आहे? यामागं नेमकं तथ्थ काय आहे, हे आज आपण समजून घेणार आहोत.

advertisement

त्वचेवर पांढरे डाग येऊ शकतात?

पारंपारिक समज असा आहे की, मासे आणि दही एकत्र खाल्ल्यास त्वचेवर पांढरे डाग येऊ लागतात. याला अनेकजण त्वचारोग किंवा ल्युकोडर्मा असे देखील म्हणतात. याशिवाय दह्याचा गुणधर्म थंड असतो आणि माशांचा उष्णा यामुळे ते पचवण्यासाठी वेगवेगळ्या एंजाइमची आवश्यकता असते आणि ते पचवण्यासाठी शरीरावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे गॅस, पोटफुगी किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात, असा देखील एख युक्तिवाद केला जातो.

advertisement

आयुर्वेदात काय समज आहे?

आयुर्वेदानुसार देखील ही दोन्ही पदार्थ एकत्र सेवन करंणं निषिद्ध मानलं जातं. मासे हा तामसिक आहार मानला जातो आणि दूध हा सात्विक आहार समजला जातो. ही दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास शरीरात तामसिक गुण वाढू शकतात आणि यामुळे पचनात असंतुलन निर्माण होते, असे मानले जाते परंतु हा दृष्टिकोन पूर्णपणे पारंपारिक समजुतींवर आधारित आहे.

advertisement

डॉक्टरांनी खोडून काढला दावा

डॉक्टरांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे. माशासोबत दही खाने हानिकारक आहे, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत असे तज्ञांचे मत आहे. बालरोग तज्ञ डॉ. सौरजित गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टा व्हिडिओमध्ये यावर स्पष्ट मत मांडले आहे. पांढऱ्या डागांबाबत बोलताना डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, हा त्वचारोग सहसा त्वचेतील रंग बनवणाऱ्या पेशी मेलेनोसाइट्स नष्ट झाल्यामुळे किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे होतो. फक्त मासे आणि दही एकत्र खाल्ल्याने ही स्थिती उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

advertisement

कोणी एकत्र खाऊ नये?

मासे आणि दही हे दोन्ही कमी प्रमाणात एकत्र खाल्ल्यास ते सुरक्षित मानले जाते. परंतु काही लोकांना ते खाल्याने काही सामन्या समस्या उद्भवू शकतात. कारण मासे आणि दही हे दोन्ही प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहेत, परंतु त्यांच्या पचनाची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे ज्यांची पचनक्रिया संवेदनशील किंवा कमकुवत आहे अशा लोकांना गॅस, पोटफुगी किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.

दुध-मासे एकत्र खाणं सुरक्षित, पण...

लैक्टोज इनटॉलरन्स किंवा दुधामधी प्रोटीनची अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांना खाज सुटणे, पुरळ येणे किंवा एक्झिमा यासारखी त्वचेची लक्षणे जाणवू शकतात. तसेच काही केसेसमध्ये माशांमधील हिस्टामाइन आणि दुग्धजन्य पदार्थांमधील लैक्टोज संवेदनशील व्यक्तींमध्ये मुरुम किंवा त्वचेवर जळजळ निर्माण करू शकतात. परंतु प्रत्यक व्यक्ती रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. तुम्हाला कोणतीही अ‍ॅलर्जी किंवा पचनाशी संबंधित समस्या नसेल, तर हे दोन्ही पदार्थ मर्यादित प्रमाणात एकत्र खाणं सुरक्षित मानलं जातं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उसात केली कोबीची शेती, शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार लाखात, कसा केला यशस्वी प्रयोग?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Food Combination : मासे आणि दही एकत्र खाऊ नये? त्वचेच्या पांढऱ्या डागांशी काय संबंध? डॉक्टरांनी सांगितलं फॅक्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल