जाणून घेऊयात अॅव्होकॅडो खाण्याचे फायदे.
अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात, जे HDL म्हणजे चांगल्या कोलेस्टेरॉलच्या वाढीला मदत करतात. रक्तात चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्याने LDL म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल आपोआपच कमी व्हायला मदत होते. याशिवाय अॅव्होकॅडोत पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे रक्तप्रवाह तर सुरळीत होऊन धमन्यांवर ताण येत नाही. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे अॅव्होकॅडोचं नियमित सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्यात सुधारणा व्हायला मदत होते.
advertisement
कोलेस्टेरॉल कसं कमी होतं?
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार असं आढळून आलं की, अॅव्होकॅडोमध्ये असलेल्या फायबर्समुळे अन्न लवकर पचायला मदत होते. त्यामुळे रक्तात फॅट्स जमा होण्याचं आणि कोलेस्टेरॉल वाढण्याचं प्रमाणंही कमी झालं होतं. मुळातच अॅव्होकॅडो खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉलचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. कारण अॅव्होकॅडो कोलेस्टेरॉलचं रूपांतर उर्जेत करतं. अॅव्होकॅडोत असलेलं व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंट हृदयाच्या ऊतींचं झालेलं नुकसान काढतात. ज्यामुळे हृदयांच्या उतींची कार्यक्षमता वाढते.
हे सुद्धा वाचा : Benefits of Avocado: रोज ॲवाकॅडो खाल्ल्याने होतील अनेक फायदे, दूर पळतील गंभीर आजार
फॅटलॉससाठी फायदेशीर:
अॅव्होकॅडोत असलेल्या फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. शिवाय पोट भरलेलं राहतं त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आपसूकच अतिरिक्त खाणं टाळलं जातं आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते. याशिवाय अॅव्होकॅडो हे चरबीचं रूपांतर उर्जेत करत असल्यामुळे पोटावरील चरबी कमी व्हायला मदत होते.
डायबिटीसवर गुणकारी :
डॉक्टरांच्या मते, अॅव्होकॅडोत असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट्स फक्त कॅलरी आणि चरबी जाळण्यासाठीच नाही तर इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी देखील फायद्याचे आहेत. त्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण वाढल्याने रक्तातली साखर आपोआपच कमी व्हायला मदत होते. त्यामुळे अॅव्होकॅडो खाणं हे हार्ट अॅटॅक,डायबिटीस आणि कोलेस्टेरॉल सारख्या गंभीर आजारांना दूर ठेवतं.