जाणून घेऊयात आरोग्यदायी घेवड्याचे विविध फायदे.
1) हृदयाचं आरोग्य सुधारतं :
घेवड्यात चांगल्या प्रमाणात पोटॅशियम आढळून येतं. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. पोटॅशियममुळे रक्तातल्या सोडियमचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची नियंत्रित राहून हृदयविकारांचा धोका कमी होतो.
2) डायबिटीस नियंत्रणात येतो :
घेवड्यात फायबर्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होते. पचनक्रिया सुधारल्याने रक्तात साखर विरघळायला वेळ लागतो. त्यामुळे घेवड्याची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.डायबिटीस असलेल्या रूग्णांना घेवड्याची भाजी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
3) वजन कमी करण्यात फायदेशीर :
ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी घेवडा खूप फायदेशीर आहे. घेवड्यात भरपूर फायबर आणि प्रथिनं असतात. फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रथिनांमुळे शरीराला ताकद मिळते. त्यामुळे कमी अन्न खाल्ल्यानेही शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेवड्याची भाजी खाणं खूप फायदेशीर आहे.
4) स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो :
घेवड्याची भाजी ही महिलांसाठी कोणत्या वरदानापेक्षा किंवा अमृतापेक्षा कमी नाहीये. जंकफूड, प्लॅस्टिकच्या अतिवापारामुळे गेल्या काही वर्षात कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. कर्करोगाच्या रूग्णांच्या सरासरीचा विचार केला तर अनेक महिला स्तनाच्या कर्करोगाच्या शिकार होतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर घेवडा गुणकारी आहे. घेवड्यात आयसोफ्लाव्होन असतात. ज्यामुळे इस्ट्रोजेनचं उत्पादन कमी व्हायला मदत होते. इस्ट्रोजेन हे कर्करोगाला कारणीभूत ठरतं.
हे सुद्धा वाचा : Health Tips : हाडं होतील मजबूत आणि हृदयही राहिल निरोगी, आहारात 'या' भाजीचं करा नियमित सेवन
5) हाडं मजबूत होतात :
घेवड्यात प्रथिनांव्यतिरिक्त कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडांची ठिसूळता कमी होऊन हाडांची घनता वाढायला मदत होते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टळतो.
घेवडा ही वर्षभर मिळणारी भाजी आहे. त्यामुळे ती केव्हाही खाणं फायद्याचं आहे. मात्र सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी किमान हिवाळ्यात तरी घेवड्याची भाजी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.