जाणून घेऊयात हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाल्ल्याने ते किती गुणकारी ठरू शकतात.
Winter special laddu: हिवाळ्यात खा ‘हे’ स्पेशल लाडू; दूर पळतील सगळे आजार, राहाल एकदम फिट
डिंक म्हणजे काय ?
डिंक म्हणजे झाडाच्या खोडातून स्रवणाऱ्या चिक. हा चिक पिवळसर पांढऱ्या रंगाचा आणि खड्यासारखा असतो. सोप्या आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर झाडाला जेव्हा एखादी जखम होते तेव्हा, जखमी भागाचं संसर्गापासून रक्षण करण्यासाठी झाड जो द्रव स्रवतो तो द्रव म्हणजे चिक. सगळी झाडं असा चिक किंवा डिंक स्रवत जरी असले तरीही आपण काही ठराविक झाडांच्या डिंकाचा वापर आहारात करतो.
advertisement
डिंकाच्या लाडूंचे फायदे काय ?
डिंक हे उष्ण प्रकृतीचं असल्याने हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यासाठी डिंकाचे लाडू फायद्याचे आहे. डिंकाच्या लाडवांमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होतं.त्यामुळे हिवाळ्यात अनेकांना जो अपचानाचा त्रास होतो तो त्रास डिंकाचे लाडू खाल्ल्याने दूर होऊ शकतो. याशिवाय पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेच्या आजारावरही डिंकाचे लाडू गुणकारी ठरू शकतात. डिंकातल्या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासोबतच हाडांचा ठिसूळपणा दूर व्हायला मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. त्यामुळे श्रमाचं काम करणाऱ्या व्यक्तींसह गर्भवती महिलांनी डिंकाचे लाडू खाल्ल्यास त्यांचा गर्भारपणातला थकवा दूर होऊ शकतो.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यात डिंकाचे लाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे चयापचयक्रिया वाढण्यासोबत यकृताचं आरोग्य सुधारायला मदत होते.डिंकामध्ये चांगले फॅटस असतात. त्यामुळे रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हृदयविकारच्या समस्यांना दूर ठेवता येतं.
शरीराच्या अंतर्गत महत्त्वाच्या अवयवांसाठी जसं डिंक महत्त्वाचं आहे तसच ते सौंदर्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराला त्वरित उर्जा मिळते. त्यामुळे जर कोणत्या कारणामुळे तुम्हाला थकवा किंवा अंगदुखी जाणवत असले तर डिंकाचे लाडू खाल्ल्याने तो त्रास दूर होईल. डिंकाचे लाडू आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा फायद्याचे आहेत. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो. मात्र डिंकाचे लाडू खाल्ल्याने त्वचा हायड्रेड राहायला मदत होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.