तणाव कमी करा
वजन कमी करण्यासाठी तुमचं शरीर जितकं स्वस्थ असणं गरजेचं आहे तितकचं तुमचं मनही शांत असणं गरजेचं आहे. तुम्ही सतत तणावात असाल तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि जरी झालंच तरीही ते दीर्घकाळ टिकणार नाही.
advertisement
डाएट म्हणून जेवणं सोडू नका
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. इंटरमिडीएट फास्टिंगच्या नावाखाली बराचवेळ उपाशी राहतात किंवा डायटिंगच्या नावाखाली पौष्टिक खाद्यपदार्थ खाणं टाळतात. पूर्ण दिवसातून एकदाच जेवतात. लक्षात घ्या, उपाशी राहून तुमचं वजन कमी होणार नाहीये. उपाशी राहिल्याने फार तर तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी (फॅट्स) कमी होईल. यामुळे तुमच्या शरीरावर असलेली सूज किंवा अतिरिक्त मांस कमी होईल पण वजन कमी होणार नाहीये. उलट आम्लपित्त, बद्धकोष्ठता, सूज येणे किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.
जंक फूड टाळा
वजन कमी करण्यासाठी जंक फूड खाणे प्रामुख्याने टाळावं. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या जेवणाच्या वेळा बदलणे आवश्यक आहे. अवेळी अन्न खाल्याने पचनाचा त्रास उद्भवतो. त्यामुळे तुम्ही संपूर्ण योग्य वेळी, योग्य प्रमाणात घेतलं तरच वजन कमी होण्यास मदत होईल.
जास्त झोप नको
वेळी अवेळी, जास्त वेळ झोपल्यामुळे देखील वजन वाढू शकते. जर तुम्ही उशिरा उठत असाल आणि रात्री उशिरा झोपत असाल तर वजन वाढेलच. कारण तुमची झोप कमी झाल्यामुळे शरीरातील संप्रेरकांच्या पातळीतील बदल होतो. ज्यामुळे जास्त भूक लागते. जेवल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटत नाही, त्यामुळे पुन्हा जास्त खाल्लं जातं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी वर्क आऊट आणि डाएट जितकी महत्वाची आहे तितकीच योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात झोप महत्वाची आहे.