पण तुम्हाला माहितीय का की यामागचं कारण तुमची चपाती किंवा चपातीचं पिठ मळण्याची पद्धत देखील असू शकते? पिठ मळताना काही घरगुती आणि सहज उपलब्ध घटक घातले, तर हे पचनाचे विकार टाळता येऊ शकतात. चला पाहूया, कोणत्या आहेत त्या 2 खास गोष्टी...
1. ओवा - गॅस आणि जळजळीवर रामबाण उपाय
ओवा ही आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरात हमखास सापडणारी गोष्ट आहे. पचन सुधारण्यात ओव्याचा खूप मोठा फायदा होतो. विशेषतः गॅस, पोटात जळजळ किंवा अन्न खाल्ल्यानंतर होणाऱ्या अस्वस्थतेवर तो अतिशय उपयुक्त आहे.
advertisement
कसं वापराल?
1 किलो गव्हाच्या पिठात 1 चमचा ओवा पावडर मिसळा. जर पावडर नसेल, तर ओवा थोडा भाजून हलका ठेचून पिठात मिसळा. यामुळे तयार होणारी भाकरी किंवा चपातीमुळे सकाळी सहजपणे पोट साफ होण्यास मदत मिळते.
2. सौफ – पचनशक्ती वाढवणारा गोडसर साथीदार
सौंफ म्हणजेच बडीशेप, जी चविला गोडसर लागते. ही पचनशक्ती सुधारण्यासाठी फारच लाभदायक आहे. सौंफ वापरल्याने गॅस, अॅसिडिटी आणि कब्जपासून सुटका मिळू शकते.
कशी वापराल?
1 किलो पिठात 1 चमचा सौंफ पावडर घालावी. जर पावडर नसेल, तर सौंफ थोडीशी कोरडी भाजून हलकी ठेचून घ्या आणि ती भाकरी किंवा चपातीच्या पिठात टाका असं नियमितपणे खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.
फास्ट फूड्सच्या सवयी बदलणं जरी अवघड असलं, तरी आपल्या दैनंदिन जेवणात छोटासा बदल केल्याने आरोग्य सुधारू शकतं. अशावेळी तुमचं चपातीचं पिठ मळताना ही दोनच गोष्टी मिसळा तुम्हाला नक्कीच पोटाच्या समस्येपासून सुटका मिळेल.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)