साप चावला हे कसे ओळखाल?
सोशल मीडियावर सर्पदंशाशी संबंधित अनेक माहिती शेअर करताना डॉ. विकास कुमार (न्यूरो आणि स्पाइन सर्जन) म्हणाले की, विषारी सापाच्या चाव्यावर सामान्यतः दोन खुणा तयार होतात, जर अनेक लहान खुणा असतील तर ते बिन विषारी सापाच्या चाव्याच्या खुणा असू शकतात.
भारतात सापांच्या 250 प्रजाती असून त्यापैकी केवळ चार सापांच्या प्रजाती या सर्वात प्राणघातक आहेत. या विषारी सापांमध्ये कोब्रा, सॉ-स्केल्ड वाइपर, कॉमन क्रेट आणि रसेलचे वाइपर यांचा समावेश आहे. विषारी सापाचा वरचा भाग त्रिकोणी असतो तर बिनविषारी सापाचा वरचा भाग सामान्य असतो.
साप चावल्यावर काय करावे?
1. साप चावल्यास ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा आणि त्या व्यक्तीला सापापासून दूर घेऊन जा.
2. जर एखाद्या व्यक्तीला हृदयाच्या खालच्या भागात साप चावला असेल तर त्याला झोपायला लावा.
3. शरीरात विष पसरण्यापासून रोखण्यासाठी, त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
4. आता जखमेला सैल आणि स्वच्छ पट्टीने झाकून टाका आणि त्याभोवती घट्ट बांधलेले कोणतेही धागे अथवा दागिने काढून टाका.
5. जर पायाला साप चावला असेल तर पायातील चप्पल अथवा बूट काढून ठेवा.
Kantoli Bhaji Recipe : वजन कमी करायचंय? तर खा कंटोळीची भाजी, जाणून घ्या झटपट रेसिपी
साप चावल्यावर काय करू नये?
1. जोपर्यंत साप चावलेल्या रुग्णाला डॉक्टर काही औषध देण्यास सांगत नाहीत तोपर्यंत त्याला स्वतःहून कोणतेही औषध देऊ नये.
2. जर जखम हृदयाच्या वरच्या भागात असेल तर ती कापण्याचा किंवा तिला हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
3. विष बाहेर चोखण्याचा प्रयत्न करू नका.
4. साप चावलेल्या जखमेवर बर्फ लावू नका.
5. व्यक्तीला कॅफीन किंवा अल्कोहोल युक्त गोष्टी खायला किंवा पिण्यासाठी देऊ नका.
6. रुग्णाला डॉक्तरांकडे चालत नेऊ नका आणि त्याला वाहनातून रुग्णालयात घेऊन जा.
