advertisement

Kantoli Bhaji Recipe : वजन कमी करायचंय? तर खा कंटोळीची भाजी, जाणून घ्या झटपट रेसिपी

Last Updated:
आहारात ऋतुमानानुसार सिजनल भाज्यांचा समावेश केला तर त्यातून शरीराला अनेक पोषकतत्व प्राप्त होतात. पावसाळ्या ऋतूचे केवळ दोन महिने बाजारात कंटोळीची भाजी मिळते. ही भाजी पोषक तत्वांनी भरपूर असून याच्या सेवनाने अनेक आजार देखील दूर होतात. कंटोळीची भाजी चवीला देखील खूप स्वादिष्ट असते. तेव्हा या भाजीची झटपट रेसिपी जाणून घ्या.
1/7
कंटोळीच्या भाजीसाठी साहित्य - पाव किलो कंटोळी, चवीनुसार मीठ, एक चमचा हळद, एक चमचा लाल तिखट मसाला, एक वाटी कांडा, तेल, कोथिंबीर.

2/7
सर्वप्रथम कंटोळीची भाजी धुवून कापून घ्यावी. मग एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाका आणि कापलेली कंटोळीची भाजी त्यात टाका.

3/7
काहीवेळ भाजी तशीच पाण्यात ठेऊन मग ती त्यातच धुवून नितळून घ्या. नितळलेली भाजी स्टीलच्या चाळणीत काढून घ्या.

4/7
एका कढईत दोन पळी तेल घेऊन त्यात कांदा टाकून गुलाबी होई पर्यंत परतवा.

5/7
मग यात हळद टाकून कांदा मिक्स करा. आता त्यात कंटोळीची भाजी टाका आणि चांगली परतवून घ्या.

6/7
भाजीत मीठ टाका आणि पाच ते दहा मिनिटे कढईवर झाकण टाकून भाजी शिजू द्या.

7/7
मग त्यात एक चमचा लाल तिखट, कोथिंबीर टाका तसेच भाजी हलवून घेऊन ती अजून पाच मिनिटे शिजवून घ्या. अशा पद्धतीने कंटोळीची स्वादिष्ट भाजी तयार होते.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement