जीवनशैली आणि आहारामुळे उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्यानं वाढते आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. हे बदल नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहारातील बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत. DASH आहाराचं पालन करणं खूप फायदेशीर ठरू शकतं. यानुसार ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि पातळ प्रथिनं यांचा समावेश आहे.
advertisement
Hair Care : केसांच्या चांगल्या पोषणासाठी या तेलांचे पर्याय लक्षात ठेवा, केस दिसतील चमकदार
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मीठ कमी करा. दररोज पाच ग्रॅमपेक्षा कमी मीठ खा. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या पदार्थांमधे सोडियमचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ते टाळा.
नियमित व्यायाम करा - नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत होतं, ज्यामुळे ते कमी प्रयत्नात जास्त रक्त पंप करू शकतं. यामुळे रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणं, वेगाने चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणं, फायदेशीर ठरू शकतं. योग आणि प्राणायाम देखील खूप प्रभावी आहेत.
वजन कमी करा - शरीराचे वजन वाढणं हे थेट रक्तदाबाशी जोडलेलं आहे. वजन कमी केल्यानं रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे विस्तारतात आणि आकुंचन पावतात. यामुळे वजन फक्त पाच-दहा % कमी झालं तरी त्याचा रक्तदाबावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
Bloating : पोटफुगीला वैतागलात ? हे सात पदार्थ देतील पोटफुगीपासून आराम
ताण व्यवस्थापन - ताणतणाव हे उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण आहे. दीर्घकाळापर्यंत ताणतणावामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, दीर्घ श्वसन आणि आवडत्या छंदांसाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. दररोज सात-आठ तास झोप घेणं देखील फायदेशीर आहे.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा - धूम्रपान आणि मद्यपानामुळे देखील रक्तदाब वाढतो. म्हणूनच, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी धूम्रपान सोडणं आणि मद्यपान टाळणं आवश्यक आहे.
