श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी जीवती पूजन केलं जातं आणि त्या दिवशी आरत्याचा नैवेद्य असतो. पण तुम्ही नाश्त्यासाठी किंवा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठीही वगैरेही बनवू शकता. कारण ही ती आरोग्यदायी, चविष्ट आणि सोपीदेखील आहे. आरत्या बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही. घरी उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यात तुम्ही ते बनवू शकता.
advertisement
आरत्या बनवण्यासाठी साहित्य
गूळ - अर्धा कप
पिकलेली केळी
तूप - 1 टीस्पून
गव्हाचं पीठ
चिमूटभर मीठ
तळण्यासाठी तेल
आरत्या कशा बनवायच्या?
केळी गुळात किसून घ्या आणि तूप घाला. तुम्ही केळी किसण्याऐवजी मॅश करू शकता. हाताने चांगलं मिसळा. गूश वितळेपर्यंत मिश्रण झाकून ठेवा. सुमारे 10 मिनिटं लागतील. पाण्याचा वापर टाळा. गुळाच्या गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. गूळ वितळला नाही तर मिश्रण एकदा ब्लेंडरमध्ये मिसळा. आता यात गव्हाचं पीठ, मीठ घालून चांगलं मिक्स करा आणि नरम पीठ मळून घ्या. पीठ झाकून ठेवा आणि सुमारे 10 मिनिटं ठेवा.
Celebrity Recipe Video : मुलांच्या डब्यासाठी रेणुका शहाणे बनवायची शॉर्टकट पुरणपोळी; सांगितली रेसिपी
आता पिठाचे लहान गोळे बनवून पुऱ्या लाटा. पुऱ्या लाटताना कोरडे पीठ किंवा तेल वापरण्याची गरज नाही. एका पॅनमध्ये तेल गरम करून तेलात पुऱ्या दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घ्या. आरत्या तयार आहेत. पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही त्यांना हवाबंद डब्यात ठेवू शकता. जर तुम्हाला ते तळायचे नसेल तर दशमी बनवा आणि भाजून घ्या.
MadhurasRecipe Marathi युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही एकदा तरी आरत्या नक्की ट्राय करून पाहा आणि कशा जाल्या आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
