सफरचंद अनेक जणांना खायलाआवडतं. मात्र काहीवेळा घरात सफरचंद जास्त होतात. अशावेळी तुम्ही त्यांचा वापर लोणचं बनवण्यासाठी करू शकता. याची चव तुम्हाला खूप आवडेल. सफरचंदाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य आणि पद्धत पुढील प्रमाणे..
सफरचंदाचं लोणचं बनवण्यासाठी तुम्हाला सफरचंद, मीठ, बडीशेप, मेथीचे दाणे, पिवळी मोहरी, मोहरीचे तेल, हिंग, कलौंजी, हळद, साखर किंवा गूळ आणि व्हिनेगर लागेल.
advertisement
असं बनवा सफरचंदाचं लोणचं..
- सर्वात आधी ताजी आणि किंचित घट्ट सफरचंद घ्या. तुम्ही लाल किंवा हिरवे कोणतेही सफरचंद वापरू शकता.
- सफरचंद धुवा आणि कोरडी करा. यानंतर त्याचे लहान लहान तुकडे करा.
- कापलेल्या सफरचंदांच्या फोडींवर मीठ शिंपडून 15 मिनिटे तसेच राहू द्या.
- यानंतर सफरचंदाच्या फोडीतील जास्तीचे पाणी काढून टाका.
- आता बडीशेप, मेथीचे दाणे आणि पिवळी मोहरी हलकी भाजून घ्या आणि जाडसर वाटा.
- नंतर गॅसवर मोहरीचे तेल गरम करा. त्यामध्ये त्यात हिंग, कलौंजी आणि हळद घाला.
- याच गरम तेलात वाटलेले मसाले, लाल मिरच्या आणि सफरचंदाचे तुकडे घालून एकत्र करा.
- हा सर्व सफरचंद थोडे मऊ होईपर्यंत मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजवा.
- आणखी छान चवीसाठी थोडी साखर किंवा गूळ आणि 2 चमचे व्हिनेगर त्यामध्ये घाला.
- नंतर गॅस बंद करा आणि हे लोणचं थंड होऊ द्या.
- लोणचं थंड झाल्यावर एका कोरड्या काचेच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
हे तुम्ही पराठा, पुरी किंवा डाळ-भातासोबत सर्व्ह करू शकता. याचा प्रकारचे अनेक लोणचे तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. मसाल्यातले प्रकार कमी जास्त करून आणखी वेगवेगळ्या चवीचे असे सफरचंदाचे लोणचे बनवू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
