महाराष्ट्राचा झणझणीत पदार्थ म्हणताच सगळ्यात आधी समोर आला असेल तो म्हणजे ठेचा.... भाकरी, चपातीसोबत भाजी नसली किंवा तोंडी लावायला काय बनवायचं असा प्रश्न पडला. की झटपट होणारा असा हा पदार्थ ठेचा. कित्येक घरांमध्ये तर दररोज बनतो. महाराष्ट्राचा हाच पदार्थ अभिनेत्री मलायकाच्या अरोराच्या घरातही बनतो पण तो वेगळ्या पद्धतीने.
Celebrity Recipe Video : मुलांच्या डब्यासाठी रेणुका शहाणे बनवायची शॉर्टकट पुरणपोळी; सांगितली रेसिपी
advertisement
ठेचा म्हणजे मिरचीचा ठेचा. अभिनेत्री मलायका अरोराच्या घरीही ठेचा बनतो पण तो पनीर ठेचा. आता हा पनीर ठेचा कसा बनवायचा याची रेसिपीही अभिनेत्रीने सांगितली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पनीर ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पनीर - 250 ग्रॅम
हिरवी मिरची - 10–12
लसणू पाकळ्या - 8–10
शेंगदाणे - 2 मोठे चमचे
तेल - एक मोठा चमचा
मीठ - चवीनुसार
पनीर ठेचा कसा बनवायचा, कृती?
गॅसवर तवा गरम करायला ठेवा. त्यात लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ टाकून तेल न टाकता कोरडेच परतून घ्या. आता हे तव्यावरून काढून घ्या, त्यात कोथिंबीर टाकून ठेचून घ्या. कोथिंबीरीचे देठही घ्यायचे आहेत. हे मिक्सरमध्ये ग्राइंड करू नका, नाहीतर हवी तशी चव मिळणार नाही असा सल्लाही मलायकाने दिला आहे.
आता पनीर किंवा टोफू तुम्हाला जे आवडेल त्या घ्या. त्याचे पिस करा आणि हा ठेचा त्याच्याभोवती लावून घ्या. एका पॅनवर अगदी थोडं तेल गरम करून त्यात हे पनीर सर्व बाजूंनी हलकेहलके भाजून घ्या.
Weird Recipe : गाजर नाही, दुधी नाही तर चक्क कांद्याचा हलवा; बनवतात तरी कसा? Watch Video
तुम्ही हा मलायकाच्या घरी बनवला जाणारा पनीर ठेचा तुमच्या घरी ट्राय करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
