TRENDING:

डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली डिश कधी खाल्लीय का? पाहा कुठे मिळतीय

Last Updated:

डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली ही डिश आवडीनं खातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर, 4 ऑक्टोबर : दाक्षिणात्य पदार्थ ख्यायला अनेकांना आवडतात. त्यामुळे नॉनव्हेजचा तडका दिलेले दाक्षिणात्य पदार्थ सध्या बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा पाहायला मिळतो. कोल्हापूरमध्येही याच प्रकारची एक डिश गेल्या 18 वर्षांपासून मिळते आहे. या पदार्थाचं नाव अंडा डोसा असं आहे. डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली ही डिश कोल्हापूर मोठ्या आवडीनं खातात.
News18
News18
advertisement

कोल्हापूरच्या शास्त्री नगर रोडवर बेस्ट अंडा डोसा अशी दस्तगीर इलाई भालदार यांची अंडा डोसाचा गाडा आहे. त्यांनी 2005 साली ऐतिहासिक बिंदू चौकात अंडा डोसा विकण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2009 पासून आजपर्यंत त्यांचा शास्त्रीनगरच्या चौकात गाडा आहे. या व्यवसायात त्यांनी पत्नी आणि मुलगाही मदत करतात.  येथील अंडा डोसा खाण्यासाठी सकाळी 8.30 पासूनच गर्दी सुरू होते दुपारी 2.30 पर्यंत हा गाडा सुरू असतो.

advertisement

इंजिनिअरने लढवली शक्कल, सुरू केलं हॉटेल, आता 2 तासात फस्त होते 65 किलो बिर्याणी

'मी सुरूवातीला कुकर, मिक्सर रिपेअर करण्याचं काम करत होतो. त्यानंतर फक्त साधा डोसा विकायला सुरूवात केली. त्यावेळी काहीतरी नवा पदार्थ बनवण्याचा विचार मी केला. त्यामधूनच या डिशची कल्पना सुचली,' असं दस्तगीर भालदार यांनी सांगितलं.

advertisement

कसा बनवतात अंडा डोसा ?

सध्या डोश्याला अंड्याचे ऑम्लेटचा टच देऊन हा अंडा डोसा बनवला जातो. सुरुवातीला तव्यावर साधा डोसा तयार करून घेतला जातो. त्यावर मेतकुट, कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, घरीच बनवलेली शेजवान चटणी टाकली जाते. यावरच अंडे फोडले जाते. मग ते व्यवस्थित एकत्र करून डोश्यावर सगळीकडे पसरवले जाते. अशा प्रकारे हा अंडा डोसा तयार होतो.

advertisement

भालदार यांच्याकडे प्लेन अंडा डोसा त्याचबरोबर अंडा उत्तापा, स्प्रिंग अंडा डोसा, स्प्रिंग हैद्राबादी डोसा, हैद्राबादी डोसा, चीज अंडा डोसा, चीज अंडा उत्तापा, चीज स्प्रिंग अंडा डोसा, चीज स्प्रिंग डोसा, डब्बल अंडा डोसा, ट्रिपल अंडा डोसा इ. पदार्थ मिळतात. तर 5 अंडी, 8 अंडी, 10 अंडी आणि 20 अंडी असणारे डोसे देखील ते बनवून देतात.

advertisement

ही कसली पैज? त्याने एकामागून एक खाल्ल्या तब्बल 81 पुऱ्या!

दस्तगीर भालदार हे गेली 18 वर्षे अंडा डोसा विकत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वस्ताई ते महागाई हा प्रवास अंडा डोश्याच्या माध्यमातून देखील पहिला आहे. ते सुरूवातील 6 रुपयांना साधा डोसा आणि 10 रुपयाला अंडा डोसा विकत असत. आता साधा डोसा घेण्यासाठी 35 तर सिंगल अंडा डोसासाठी 45 रुपये ग्राहकांना मोजावे लागतात.

एखाद्या अनोख्या डिशची चव चाखायला कोल्हापूरकर नेहमीच उत्सुक असतात. पण, गेली 18 वर्षे हा कोल्हापूरकरांच्या जिभेला पसंत पडलेला अंडा डोसा आजही एक नवीन डिश असल्याप्रमाणेच विकला जातोय.

नागपूरची प्रसिद्ध संत्रा बर्फी खाल्लीत का? पाहा काय आहे खास? Video

कुठं खाणार अंडा डोसा?

शास्त्रीनगर चौक, शास्त्रीनगर चौक, यादव नगर मेन रोड, कोल्हापूर, 416008

संपर्क : +91 8796431515

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली डिश कधी खाल्लीय का? पाहा कुठे मिळतीय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल