इंजिनिअरने लढवली शक्कल, सुरू केलं हॉटेल, आता 2 तासात फस्त होते 65 किलो बिर्याणी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हॉटेल सकाळी 10 वाजता सुरू होतं, परंतु बिर्याणी दुपारी मिळते, त्यामुळे दुपारपासून इथे ग्राहकांची गर्दी वाढते.
प्रदीप वर्मा, प्रतिनिधी
गिरिडीह, 4 सप्टेंबर : श्रावण संपल्यापासून बाजारात चिकन, मटण, मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. तुम्हाला चिकन आवडतं, मटण आवडतं की मासे? असा प्रश्न विचारल्यावर भलेभले गोंधळतात. कारण हे तीनही पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि त्या प्रत्येक पदार्थाची चव एकमेकांवर भारी पडते. मात्र त्यातल्या त्यात बिर्याणी हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो, मग ती चिकन बिर्याणी असो, मटण बिर्याणी असो किंवा कोळंबी बिर्याणी असो.
advertisement
झारखंडच्या गिरिडीह भागातील एका इंजिनिअरच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या स्वादिष्ट बिर्याणीला सध्या ग्राहकांची विशेष पसंती मिळते. इथल्या बिर्याणीत 20 किलो तांदूळ आणि 45 किलो चिकन असतं. ही पूर्ण बिर्याणी चक्क 2 तासांत संपते. दुपारी हॉटेलमध्ये बिर्याणीप्रेमींची मोठी गर्दी असते. ग्राहक हॉटेलमध्ये बसून बिर्याणीचा आस्वाद घेतातच, मात्र सोबत पार्सलही घेऊन जातात.
advertisement
हॉटेल मालक बेलाला खान यांनी भोपाळच्या पीपल विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना नोकरी मिळाली नाही. अखेर त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. गिरिडीहमध्ये एक हॉटेल सुरू करून त्याला नाव दिलं 'चनका हाऊस'. या हॉटेलमध्ये कोलकाताचे खास चेफ आहेत. हॉटेल सकाळी 10 वाजता सुरू होतं, परंतु बिर्याणी दुपारी मिळते, त्यामुळे दुपारपासून इथे ग्राहकांची गर्दी वाढते.
advertisement
इथे बिर्याणीसोबत रायता आणि सलाडही सर्व्ह केलं जातं. हाल्फ प्लेट बिर्याणीत 300 ग्रॅमचा 1 चिकन पीस आणि 1 अंड मिळतं. हाल्फ प्लेटची किंमत आहे 80 रुपये. तर, फूल प्लेट बिर्याणीत भाताचं प्रमाण अधिक असतं, शिवाय त्यात 2 अंडी आणि चिकनचे 2 पीस मिळतात. फूल प्लेटची किंमत आहे 140 रुपये. दरम्यान, हाल्फ प्लेटमध्येच एका व्यक्तीचं पोटभर जेवण होतं, असं इथे येणारे ग्राहक सांगतात.
Location :
Giridih,Jharkhand
First Published :
October 04, 2023 8:54 AM IST