advertisement

Smriti Mandhana : 'दीड महिन्यात स्मृतीने जे सहन केलं...', RCB ने ट्रॉफी जिंकताच श्रेयांका पाटील झाली इमोशनल

Last Updated:

महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव केला आहे. या विजयानंतर श्रेयांका पाटील स्मृती मानधनासाठी भावुक झाली.

'दीड महिन्यात स्मृतीने जे सहन केलं...', RCB ने ट्रॉफी जिंकताच श्रेयांका पाटील झाली इमोशनल
'दीड महिन्यात स्मृतीने जे सहन केलं...', RCB ने ट्रॉफी जिंकताच श्रेयांका पाटील झाली इमोशनल
वडोदरा : महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटने पराभव केला आहे. दिल्लीने दिलेलं 204 रनचं आव्हान आरसीबीने 19.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल आरसीबीच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. स्मृतीने 41 बॉलमध्ये 87 तर जॉर्जिया वॉलने 54 बॉलमध्ये 79 रनची खेळी केली. डब्ल्यूपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या टीमला एवढं मोठं आव्हान यशस्वीरित्या पार करता आलं आहे.
स्मृती मानधनाने 212.20 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 3 सिक्स आणि 12 फोर मारल्या. आरसीबीची ही दुसरी डब्ल्यूपीएल ट्रॉफी आहे. डब्ल्यूपीएल 2026 मध्ये स्मृती मानधनाने सर्वाधिक रन केले, ज्यामुळे तिला ऑरेंज कॅप देऊन गौरवण्यात आलं. स्मृतीने डब्ल्यूपीएलच्या या मोसमात 377 रन केले. आरसीबीच्या या विजयानंतर स्मृतीसह तिच्या टीममधल्या खेळाडूही भावूक झाल्या.
advertisement
मागच्या दीड महिन्यामध्ये स्मृतीने बरंच काही सहन केलं आहे, त्यामुळे हा विजय तिला समर्पित असल्याची प्रतिक्रिया आरसीबीची खेळाडू श्रेयांका पाटीलने दिली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये स्मृती मानधनाचं पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होतं, पण लग्नाच्या काही तास आधीच हा सोहळा रद्द केला गेला. स्मृती आणि पलाशच्या या लग्नावरून बरेच वादही रंगले. अखेर स्मृतीने लग्न रद्द झालं असून आम्ही दोघेही वेगळ्या मार्गाने जात असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं.
advertisement
वैयक्तिक आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ येऊनही स्मृती खचली नाही. पुढच्या काही दिवसांमध्येच ती पुन्हा एकदा मैदानात उतरली, एवढंच नाही तर तिने आरसीबीला दुसरी ट्रॉफी जिंकवून दिली आणि सर्वाधिक रन केल्याबद्दल ऑरेंज कॅपही मिळवली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : 'दीड महिन्यात स्मृतीने जे सहन केलं...', RCB ने ट्रॉफी जिंकताच श्रेयांका पाटील झाली इमोशनल
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement