Sourav Ganguly : 2003 पासून दु:ख संपेना... 10 दिवसांमध्ये सौरव गांगुलीचा दुसऱ्यांदा हार्टब्रेक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताचा सर्वोत्तम कॅप्टन कोण? असा प्रश्न विचारला तर बहुतेक क्रिकेट चाहते सौरव गांगुलीचं नाव घेतील. सौरव गांगुलीने युवा खेळाडूंना घेऊन टीम बनवली, पण गांगुलीला मात्र एकही वर्ल्ड कप जिंकता आला नाही.
बडोदा : भारताचा सर्वोत्तम कॅप्टन कोण? असा प्रश्न विचारला तर बहुतेक क्रिकेट चाहते सौरव गांगुलीचं नाव घेतील. सौरव गांगुलीने युवा खेळाडूंना घेऊन टीम बनवली, पण गांगुलीला मात्र एकही वर्ल्ड कप जिंकता आला नाही. 2003 सालच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दादाच्या नेतृत्वात टीम इंडिया फायनलला पोहोचली होती, पण फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला, त्यामुळे गांगुलीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गांगुली बीसीसीआयचा अध्यक्षही होता, त्यानंतर आता गांगुलीने प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये नवी इनिंग सुरू केली, यासाठी तो दिल्ली कॅपिटल्ससोबत जोडला गेला. दक्षिण आफ्रिकेतील टी-20 लीग असलेल्या एसए 20 मध्ये गांगुली प्रिटोरिया कॅपिटलचा हेड कोच होता. कोच म्हणून आपल्या पहिल्याच कार्यकाळात गांगुलीची टीम एसए 20 च्या फायनलमध्ये पोहोचली, पण 25 जानेवारीला झालेल्या फायनलमध्ये प्रिटोरिया कॅपिटलचा 6 विकेटने पराभव झाला.
advertisement
- Lost the Final in 2023.
- Lost the Final in 2024.
- Lost the Final in 2025.
- Lost the Final in 2026.
4TH CONSECUTIVE DEFEAT IN WPL FINAL FOR DELHI CAPITALS. pic.twitter.com/e9GMZcReDh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2026
advertisement
एसए टी-20 फायनलच्या 10 दिवसांमध्येच सौरव गांगुलीच्या दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीगमध्येही धक्का लागला आहे. डब्ल्यूपीएलच्या फायनलमध्ये आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेटनेच पराभव केला आहे.
2023 ते 2026 अशा डब्ल्यूपीएलच्या लागोपाठ 4 फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रवेश केला, पण या चारही फायनलमध्ये दिल्लीला पराभवाचा धक्का बसला आहे.
Location :
Vadodara,Gujarat
First Published :
Feb 05, 2026 11:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sourav Ganguly : 2003 पासून दु:ख संपेना... 10 दिवसांमध्ये सौरव गांगुलीचा दुसऱ्यांदा हार्टब्रेक!









