advertisement

'...मग टीम इंडियाला बाहेर केलं असतं का?', इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर ICC वर संतापला

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून वाद सुरू आहे, यावरून इंग्लंडच्या क्रिकेटपटूने आयसीसीवर निशाणा साधला आहे.

'...मग टीम इंडियाला बाहेर केलं असतं का?', इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर ICC वर संतापला
'...मग टीम इंडियाला बाहेर केलं असतं का?', इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर ICC वर संतापला
मुंबई : 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधून बांगलादेशला वगळण्यात आयसीसीच्या भूमिकेवर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 'जर टीम इंडियाने शेवटच्या क्षणी एखाद्या देशात खेळण्यास नकार दिला असता, तर आयसीसीने अशीच कठोर कारवाई केली असती का?', असा प्रश्न नासिर हुसेन यांनी विचारला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून काढून टाकले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला आणले.
स्काय स्पोर्ट्स क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना हुसेन यांनी विचारले, "जर एखादा संघ, विशेषतः टीम इंडिया, स्पर्धेच्या एक महिना आधी म्हणतो की त्यांचे सरकार त्यांना एखाद्या देशात खेळण्याची परवानगी देत नाही, तर आयसीसी फक्त असे म्हणेल का, 'नियम आहेत आणि आम्ही तुम्हाला वगळत आहोत?'"
advertisement
57 वर्षीय हुसेन यांनी जागतिक क्रिकेटमध्ये नियमांमध्ये एकरूपता आणण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की बांगलादेश, पाकिस्तान आणि टीम इंडिया या सर्वांना समान मानकांवर ठेवले पाहिजे. टीम इंडियाचे चाहते म्हणू शकतात, आमच्याकडे पैसे आहेत,' पण सत्तेसोबत जबाबदारी येते.
बीसीसीआयच्या सूचनेनुसार बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर बांगलादेशने सुरक्षेचं कारण देऊन भारतात वर्ल्ड कप खेळायला नकार दिला.
advertisement
बांगलादेशला वगळल्यानंतर, पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे टीम इंडियाविरुद्धच्या टी20 वर्ल्ड कप सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया दिली.
नासिर हुसेन यांनी इशारा दिला की जर राजकारण क्रिकेटवर वर्चस्व गाजवत राहिले तर खेळाचे स्वतःचे नुकसान होईल. 'बांगलादेश आपल्या खेळाडूंच्या बाजूने उभा राहिला याबद्दल मी त्याचे कौतुक करतो. पाकिस्ताननेही बांगलादेशला पाठिंबा दिला. आता राजकारण बाजूला ठेवून क्रिकेट खेळण्याची वेळ आली आहे', असं हुसेन म्हणाले.
advertisement
आयसीसीने पाकिस्तानला इशारा दिला आहे की जर त्यांनी बहिष्काराचा निर्णय कायम ठेवला, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'...मग टीम इंडियाला बाहेर केलं असतं का?', इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर ICC वर संतापला
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement