advertisement

नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट

Last Updated:

Financial Crisis: 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीची अचूक भविष्यवाणी करणारे अर्थतज्ज्ञ पीटर शिफ यांनी पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकन डॉलर कोसळून त्याची जागा सोनं घेईल, असा दावा करत त्यांनी 2008 पेक्षाही मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता व्यक्त केली आहे.

Rapid Read
Translate
News18
News18
मुंबई: 2008 मधील जागतिक आर्थिक मंदीची अचूक भविष्यवाणी करणारे अमेरिकन अर्थतज्ज्ञ पीटर शिफ यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, अमेरिकन डॉलर लवकरच कोसळू शकतो आणि त्याची जागा सोनं घेऊ शकतं. यावेळी शिफ यांनी केवळ मंदीचाच नाही, तर 2008 पेक्षाही भयंकर आर्थिक संकटाचा अंदाज व्यक्त केला आहे, जे अमेरिका अक्षरशः हादरवून टाकेल, असा दावा त्यांनी केला आहे.
पीटर शिफ यांच्या या वक्तव्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारतज्ज्ञांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिफ यांना ‘डॉक्टर डूम’ या टोपणनावानेही ओळखले जाते. 2008 च्या आर्थिक संकटाची अचूक पूर्वसूचना देऊन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
फॉक्स बिझनेसवरील मुलाखतीत धक्कादायक विधान
पीटर शिफ यांनी हे विधान फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत केलं असून, त्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत शिफ म्हणाले, “डॉलर बुडणार आहे. त्याची जागा सोनं घेईल. आपण ज्या आर्थिक संकटाच्या दिशेने जात आहोत, ते 2008 च्या मंदीपेक्षा कितीतरी मोठं असेल.”
advertisement
मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की हे संकट मुख्यत्वे अमेरिकेपुरतंच मर्यादित राहील आणि 2008 प्रमाणे संपूर्ण जगभर मंदी पसरणार नाही, असा त्यांचा अंदाज आहे.
डॉलरपासून दूर जातायत देश आणि केंद्रीय बँका
पीटर शिफ यांच्या मते, अनेक देश आणि जगभरातील केंद्रीय बँका हळूहळू अमेरिकन डॉलर आणि यूएस ट्रेझरीपासून दूर जात आहेत. आपल्या चलनाला आधार देण्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा वाढवत आहेत. त्यांच्या मते, हा बदल म्हणजे जागतिक आर्थिक व्यवस्थेत (Global Monetary System) सुरू असलेला खोल आणि संरचनात्मक बदल आहे.
advertisement
शिफ यांचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदार आणि सरकारे आता डॉलरवरील अवलंबित्व कमी करत असून, सोन्यामध्ये आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यावर भर देत आहेत. त्यांनी याबाबत इशारा देत सांगितलं की, लोक अजूनही येणाऱ्या संकटाची गंभीरता नीट समजून घेत नाहीत, हीच सर्वात मोठी धोक्याची बाब आहे.
2008 च्या संकटाची भविष्यवाणी आधीच केली होती
पीटर शिफ 2008 मधील आर्थिक मंदीची भविष्यवाणी करणारे मोजके अर्थतज्ज्ञांपैकी एक आहेत. त्या वेळी त्यांनी अमेरिकेतील हाउसिंग मार्केट आणि बँकिंग सिस्टिममध्ये मोठा धोका निर्माण होत असल्याचा इशारा दिला होता, जो पुढे जाऊन खरा ठरला.
advertisement
शिफ यांचं म्हणणं आहे की, यावेळी संकटाचा केंद्रबिंदू अमेरिका असेल, तर 2008 मध्ये मंदीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला होता. त्यांच्या मते, अमेरिकन अर्थव्यवस्था जितकी मजबूत दाखवली जाते, तितकी प्रत्यक्षात नाही आणि हीच गोष्ट आगामी संकटाचं मुख्य कारण ठरू शकते.
कोण आहेत पीटर शिफ?
पीटर शिफ हे युरो पॅसिफिक अ‍ॅसेट मॅनेजमेंट या गुंतवणूक संस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध फंड मॅनेजर आहेत. ते दीर्घकाळापासून अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या धोरणांचे आणि फियाट करन्सीचे टीकाकार राहिले आहेत. शिफ नेहमीच सोनं आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement