नागपूरची प्रसिद्ध संत्रा बर्फी खाल्लीत का? पाहा काय आहे खास? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
संत्रा नगरी म्हणून नागपूरची ओळख आहे. येथील संत्रा बर्फी प्रसिद्ध आहे.
नागपूर, 4 ऑक्टोबर: विदर्भातील नागपूरच्या परिघात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात होतं. जगाच्या नकाशात 'संत्रा नगरी' म्हणून नागपूरची विशेष ओळख आहे. येथील संत्री म्हणजे नागपूरकरांच्या अभिमानाचा विषय आहे. नागपुरात सत्र्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात आणि त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यातीलच एक पदार्थ म्हणजे संत्रा बर्फी होय. कुणीही नागपुरात आलं की आवर्जून बर्फी खातोच. पण या संत्रा बर्फीत नेमकं काय खास आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
प्रत्येक शहराची आपली अशी एक खाद्य संस्कृती असते. नागपूर शहराने देखील आपली हीच आगळी वेगळी ओळख जपली आहे. मग ते झणझणीत सावजी मटण चिकन असो की जिभेवर रेंगाळणारी चव असलेली नागपुरी संत्रा बर्फी. या नागपुरी मेनुचा मोठा चाहता वर्ग असून देशाच्या कानाकोपऱ्यात या पदार्थाची ख्याती पोहचली आहे.
advertisement
फ्रेश संत्र्यांची बर्फी
नागपुरात गेल्या दोन दशकांपासून संत्र्यापासून संत्रा बर्फी आणि इतर पदार्थ तयार केले जातात. या स्वादिष्ट पदार्थाच्या निर्मितीसाठी नागपुरातील हिरा स्वीट प्रख्यात आहे. नागपूर लगतच्या भागात भौगोलिकदृष्ट्या आणि संत्रा लागवडीसाठी पूरक असे वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रीचे उत्पादन घेण्यात येते. या ताज्या संत्रीचा मार्मलेड (मुरंबा) तयार करून ही संत्रा बर्फी तयार करण्यात येते.
advertisement
बर्फीसोबत संत्र्याचे फेमस पदार्थ
भारतभर प्रसिद्ध असलेली संत्रा बर्फी नागपूरच्या खाद्य संस्कृतीतील महत्त्वाचा पदार्थ आहे. संत्रा बर्फी सोबतच संत्रा रोल, संत्रा काजू कतली, ऑरेंज सोनपापडी, ऑरेंज बाईट्स असे पदार्थ तयार करण्यात येतात. तसेच हे सर्व पदार्थ विशेषतः महिला तयार करत असल्याची माहिती हिरा स्वीटचे मालक आत्माराम वाझिरणी यांनी दिली.
advertisement
संत्रा बर्फीचे दिवाने
अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई तयार करण्याची लगबग सुरू आहे. इतर सणासुदीप्रमाणे दिवाळीत मिठाईची फार मागणी असते. आमच्या येथील मिठाईमध्ये सर्वाधिक पसंती संत्रा बर्फीला आहे. बाहेरील लोकं देखील या संत्रा बर्फीचे दिवाने असून बर्फी खरेदीसाठी नागपुरात येतात, असे आत्माराम वाझिरणी सांगतात.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 04, 2023 2:43 PM IST