नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? नवरात्रीत ट्राय करा उपवासाचे चाट

Last Updated:

कोणत्याही उपवासाला नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. तेव्हा उपवासाचे चाट एक उत्तम पर्याय आहे. पाहा रेसिपी

+
नेहमीचे

नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? नवरात्रीत ट्राय करा उपवासाचे चाट

वर्धा, 3 ऑक्टोबर: गणेशोत्सव संपून आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. नवरात्रीत अनेकजण उपवास करत असतात. या काळात शाबू, भगर आणि नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. नेहमीपेक्षा वेगळा उपवासाचा पदार्थ ट्राय करण्याची इच्छा असते. अशांसाठी उपवासाचा चाट हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी नीलम वांदिले यांनी उपवासाच्या चाटची खास रेसिपी सांगितली आहे.
उपवासाच्या चाटसाठी साहित्य
कोणताही पदार्थ बनवायचा तर साहित्य आलंच. उपवासाच्या चाटसाठी घरातील साहित्य वापरू शकता. त्यासाठी उकडून किसलेला बटाटा, लाल तिखट, हिमालयीन मीठ, जिरेपूड, मिरेपूड, गोड दही, भजलेले शेंगदाणे, बटाट्याचे पातळ चिप्स, उपवासाची शेव(शिंगाड्याचे शेव), डाळिंबाचे दाणे, हिरवी मिरची पेस्ट, खोबरा कीस हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
उपवासाचा चाट बनवायचा कसा?
सर्वप्रथम किसलेला बटाटा घेऊन त्यात तिखट, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, शेंगदाणे ऍड करून चापट गोळा म्हणजेच कटलेट बनवून घ्या. गरम नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल घालून हे कटलेट मंद आचेवर शॅलोफ्राय करा. दोन्ही बाजूने चांगलं फ्राय झाल्यावर थोडं थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर एका डिश मध्ये सर्व्ह करण्यासाठी कटलेट वर भरपूर गोड दही घाला. त्यावर तिखट, मीठ, जिरेपूड, मिरेपूड, खोबराकीस, डाळिंबाचे दाणे, उपवासाची शेव, हिरवी मिरची पातळ चिप्स थोडे क्रश करून घालू शकता. आता ही उपवासाची चाट कटलेट झटपट बनून तयार आहेत. ती खायला मस्त आणि चविष्ट आहेत, असं वांदिले सांगतात.
advertisement
कोणीही सहज बनवू शकतो अशी ही अगदी सोप्पी रेसिपी आहे. तसेच सहज घरी उपलब्ध असलेल्या सहित्यापासून बनलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ही उपवासाला नवीन काय बनवावं असा प्रश्न पडला असेल? तर उपवासाची चाट ही झटपट बनवून तयार होणारी टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलात? नवरात्रीत ट्राय करा उपवासाचे चाट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement