advertisement

'या अल्लाह, या अल्लाह...'; चेंडू हवेत अन् वाटलं एका क्षणात सगळं संपलं, PAK खेळाडूला कशाची होती भीती

Last Updated:

T20 World Cup 2026: अटीतटीच्या क्षणी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात फहीम अश्रफने पाकिस्तानसाठी अविश्वसनीय खेळी साकारली. झेल हवेत असताना ‘या अल्लाह, या अल्लाह’ अशी प्रार्थना करत त्याने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेत सामना पलटवला.

News18
News18
कोलंबो: पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात आयसीसी टी-20 वर्ल्डकपमधील पहिली मॅच कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर झाली. वर्ल्ड क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या तुलनेने नवखा असलेल्या नेदरलँड्सने ही मॅच अखेरच्या षटकापर्यंत नेली. मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने सर्वबाद 147 धावा केल्या होत्या. मात्र या धावा करण्यासाठी पाकिस्तानला चांगला घाम गाळावा लागला.
नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी धावा दिल्याच नाही पण त्या बरोबर नियमीत अंतराने विकेट्स देखील घेतल्या. यामुळे मॅचमध्ये एक वेळ अशी आली होती की पाकिस्तानचा पराभव स्पष्टपणे दिसत होता. पाकिस्तानने 98 धावात फक्त 3 विकेट गमावल्या होत्या. पण नेदरलँड्सने त्यांची अवस्था ७ बाद 147 अशी केली. मॅच नेदरलँड्सच्या हातात होती. पाकिस्तानला 12 चेंडूत 29 धावा हव्या होत्या. अशात 19व्या ओव्हरमध्ये त्यांनी 1 महत्त्वाचा कॅच सोडला आणि तब्बल 24 धावा दिल्या. या एका ओव्हरने मॅच नेदरलँड्सच्या हातातून गेली.
advertisement
पाकिस्तानकडून फहीम अश्रफ विजयाचा हिरो ठरला. त्याने 11 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या. ज्यात 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. मॅच झाल्यानंतर फहीमने अटीतटीच्या क्षणी मैदानावर काय घडले याबद्दल सांगिले. यावेळी फहीम जे काही बोलला आता त्याची चर्चा सुरू झाली आहे.
फहीम अश्रफ याने एका षटकात डच वेगवान गोलंदाजाची अक्षरशः धुलाई करत 24 धावा वसूल केल्या. मात्र याच षटकात एक क्षण असा आला, ज्याने सामना पूर्णपणे पलटू शकला असता. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर फहीमचा उंच फटका हवेत गेला, पण लाँग ऑनवर मॅक्स ओ’डाऊडकडून झेल सुटला आणि फहीमला जीवदान मिळालं. या झेलमुळे नेदरलँड्सला सामन्यात परत येण्याची संधी होती, पण ती हुकली.
advertisement
या अल्लाह, या अल्लाह
पोस्ट-मॅच शोमध्ये बोलताना फहीम म्हणाला, मागील एक वर्ष आम्ही साधारण एकसारखाच क्रिकेट खेळतोय. त्यामुळे संघात जी जबाबदारी दिली जाते, ती शांतपणे आणि शक्य तितक्या उत्तम पद्धतीने पार पाडण्यावर आमचा भर असतो. त्या क्षणी हृदयाची धडधड वेगळी होती, पण असा दबाव नवीन नव्हता. पहिल्यांदाच असं काही घडत होतं असंही नव्हतं. त्यामुळे मैदानात जाऊन आपल्याला जे जमतं, तेच करण्यावर लक्ष केंद्रित केलं.
advertisement
फलंदाजी करताना पार्टनरसोबत चर्चा इतकीच होती की विकेट फुकट देऊ नये. एकावेळी एक षटक खेळायचं. एखाद-दोन चौकार मिळाले, तर आपण लक्ष्याच्या आणखी जवळ जाऊ. सुदैवाने आम्ही जे ठरवलं होतं, तेच घडलं.
तो पुढे म्हणाला, जेव्हा चेंडू हवेत जातो, तेव्हा फक्त एकच इच्छा असते की तो जमिनीवर पडावा. आमचा प्रयत्न नेहमी सामना लवकर संपवण्याचा असतो. पण अशा क्षणी सर्वात महत्त्वाचं असतं ते नर्व्ह्स कंट्रोलमध्ये ठेवणं.
advertisement
झेल सुटला आणि जीव भांड्यात
झेल सुटल्याच्या क्षणाबद्दल बोलताना फहीमने मनमोकळेपणाने कबुली दिली, मी अशा परिस्थितीत अनेकदा खेळलो आहे. त्यामुळे हार्टबीट कंट्रोलमध्ये होती. मी स्वतःला फक्त एवढंच सांगत होतो; जे येतं, ते कर. पण चेंडू हवेत गेल्यावर प्रार्थना करत होतो, ‘या अल्लाह, कॅच ड्रॉप होऊ देत … या अल्लाह, कॅच ड्रॉप होऊ देत आणि सुदैवाने तसंच झालं'.
advertisement
या जीवदानानंतर फहीमने संधीचा पूर्ण फायदा घेत सामना पाकिस्तानच्या बाजूने वळवला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'या अल्लाह, या अल्लाह...'; चेंडू हवेत अन् वाटलं एका क्षणात सगळं संपलं, PAK खेळाडूला कशाची होती भीती
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement