आता ठाण्यात मिळतायेत मेक्सिकन पदार्थ, पाहा कसा बनतोय चिकन टॅकोस?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ठाण्यात चायनिज सोबत आता मेक्सिकन पदार्थांनाही मोठी मागणी आहे. चिकन टॅकोस खाण्यासाठी मोठी गर्दी होतेय.
ठाणे, 4 ऑक्टोबर: आपण भारतीय पदार्थांसोबत काही परदेशी पदार्थांचाही आस्वाद घेतला असेल. विशेषत: आपल्याकडे ठिकठिकाणी चायनिज पदार्थांचे गाडे दिसतात. मात्र, आता जगभरातील इतर देशांतील पदार्थांनाही मोठी पसंती मिळत आहे. ठाण्यातील एका स्नॅक्स कॉर्नरवर चक्क मेक्सिकन खाद्यपदार्थ मिळतायेत. विशेष म्हणजे चिकन टॅकोस आणि इतर पदार्थांना ठाणेकरांची मोठी पसंती मिळतेय. चिकन टॅकोस नेमके बनवतात कसे? याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत.
हॉटेल मॅनेजमेंटनंतर सुरू केला व्यवसाय
ठाण्यातील 23 वर्षीय तरुण रोहील अमित मोहिले हा कात्सु कट्ट्याचा मालक आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला. विविध प्रकारच्या डिश तयार करण्याची आवड त्याला पूर्वीपासूनच होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला रोहील घरातूनच मेक्सिकन पदार्थांच्या ऑर्डर्स घेत होता. कालांतराने टॅकोसची वाढती मागणी लक्षात घेता त्याने स्वतःचे कात्सु कट्टा नावाचा स्टॉल ठाण्यात सुरू केला.
advertisement
कात्सु कट्टावर खवय्यांची गर्दी
ठाण्याच्या सिडको बस स्टॉप परिसरात कात्सु कट्टा नावाचा फूड स्टॉल आहे. हे ठिकाण ठाणेकरांना युनिक पदार्थाचा स्वाद प्रदान करत आहे. या ठिकाणी मेक्सिकन पदार्थ म्हणजेच व्हेज व नॉनव्हेज टॅकोस मिळतात. 100 ते 110 रुपयांत मिळणाऱ्या या पदार्थाला खवय्यांची विशेष मागणी आहे. त्यामुळे नेहमीच या ठिकाणी खवय्यांची गर्दी दिसते.
advertisement
कसा तयार होतो चिकन टॅकोस?
ठाण्यात चिकन टॅकोस हा मेक्सिकन पदार्थ खवय्यांची मनं जिंकत आहे. हा पदार्थ तयार करण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे. सर्वप्रथम मैद्याची एक चपाती तव्यावर गरमागरम शेकली जाते. ज्याला टोरटिया असे देखील म्हटले जाते. त्या गरमागरम टोरटियावर मोझरेला चीज घातले जाते. त्यानंतर त्या चीज वर लेटेस् आणि चिरलेला कांदा घातला जातो. त्यावर तळलेल्या चिकनचे खाप कापून त्या टॉरटियाला एखाद्या फ्रॅपप्रमाणे अर्धे दुमडले जाते. दोन्ही बाजूने टोरटिया खरपूस भाजून घेतला जातो. तयार पदार्थाला चिकन टेकॉस म्हटले जातं. हा चिकन टॅकोस पदार्थ खवय्यांना सॉस सोबत सर्व्ह केले जातो. अशी माहिती कात्सू कट्ट्याचा मालक रोहील मोहिले याने दिली.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 04, 2023 12:44 PM IST