VIDEO : द्रविडने चूक केली, पण वेस्ट इंडिज हुशार निघाली, वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात खेळाडूचा धमाका
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधला दुसरा सामना हा वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात टी20 वर्ल्ड कपमधली पहिली हाफ सेंच्यूरी आली आहे.
West Indies vs Scotland, Shimron Hetmyer Half Century : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमधला दुसरा सामना हा वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात टी20 वर्ल्ड कपमधली पहिली हाफ सेंच्यूरी आली आहे. अवघ्या 22 बॉलमध्ये ही हाफ सेंच्यूरी एका खेळाडूने केली होती.ही खेळी पाहून भारताच्या दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने आयपीएलमध्ये मोठी चूक केल्याचे बोलले जात आहे. पण वेस्ट इंडीजने डोकं लावल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये त्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे द्रविडकडून नेमकी काय चूक झाली? आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूने काय कामगिरी केली? हे जाणून घेऊयात.
खरं तर वेस्टइंडिजच्या शिमरन हेटमायरने स्कॉटलँड विरूद्ध 22 बॉलमध्ये हाफ सेंच्यूरी केली होती. या खेळी दरम्यान हेटमायरने 6 षटकार आणि एक चौकार मारला होता. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 200 च्या आसपास होता.त्यानंतर तो पुढे जाऊन तो 36 बॉलमध्ये 54 धावा करून बाद झाला. हेटमायरने जितकी जबरदस्त खेळी केली, तितकीच जबरदस्त साफयान शरीफने बाऊन्ड्री लाईनवर त्याची कॅच घेतली होती.
advertisement
22 BALL FIFTY BY SHIMRON HETMYER IN THE T20 WORLD CUP. 🤯pic.twitter.com/FUgsIcuAaH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 7, 2026
दरम्यान हेटमायर हा तोच खेळाडू आहे जो राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळतो. या संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. द्रविड नेहमीच हेटमायरला डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी करायला पाठवायचा. पण कमी बॉल खेळायला मिळत असल्याने त्याला फारशी चांगली फलंदाजी करायला मिळायची नाही. पण आज वेस्ट इंडिजने वर्ल्ड कपमध्ये हेटमायरला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवून हुशारी दाखवली होती. हीच हुशारी वेस्ट इंडिजच्या कामी आली आहे. कारण हेटमायरने स्कॉटलँड विरूद्ध 36 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 2 चौकार लावले आहेत.
advertisement
दरम्यान हेटमायरच्या 64 धावा आणि ब्रॅडन किंगच्या 35 धावांच्या बळावर वेस्ट इंडिजने 182 धावा दिल्या आहेत. त्यामुळे स्कॉटलँडसमोर 183 धावांचे लक्ष्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 4:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : द्रविडने चूक केली, पण वेस्ट इंडिज हुशार निघाली, वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात खेळाडूचा धमाका







