Leftover Rice Dosa : रात्रीचा भात उरलाय? फेकू नका, त्यापासून बनवा झटपट डोसा! न आंबवता बनेल टेस्टी-क्रिस्पी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dosa Recipe : उरलेल्या भाताचा झटपट बनणारा हा टेस्टी डोसा आंबवलेल्या पिठाच्या डोशासारखाच क्रिस्पी बनतो. विशेष म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
मुंबई : बऱ्याचदा रात्री आपल्याकडे संपूर्ण स्वयंपाक केलेला असतो आणि नेमका त्यातला भात उरतो. नेहमी फोडणीचं आभार खायलाही बरीच लोकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही हा उरलेल्या भाताचा झटपट बनणारा टेस्टी डोसा बनवू शकता. हा डोसा आंबवलेल्या पिठाच्या डोशासारखाच क्रिस्पी आणि जाळीदार बनतो. विशेष म्हणजे तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही.
हा क्रिस्पी आणि जाळीदार डोसा बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा साहित्य लागणार नाही फक्त. रवा, दही आणि काही साधे मसाले वापरून तुम्ही झटपट हा डोसा काही मिनिटांतच तयार करू शकता. शिवाय याची चवही घरात सर्वांना खूप आवडेल. तुमच्याकडे नाश्ता बनवण्यासाठी फार वेळ नसेल तर तर ही डिश आणि रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे.
advertisement
गृहिणी प्रियांका यांनी लोकल 18 शी बोलताना या डोशाची रेसिपी सांगितली आहे. त्यांनी सांगितलं, हा स्वादिष्ट डोसा बनवण्यासाठी तुम्हाला एक कप उरलेला शिजवलेला भात, पाऊण कप रवा, पाऊण कप ताजे दही, दोन भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या, लसणाच्या दोन मोठ्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी लागेल.
यामध्ये डोसा भाजण्यासाठी तुम्ही तेल, तूप किंवा बटर, तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता. डोसा बनल्यावर त्यावर टाकण्यासाठी थोडं किसलेलं चीज, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोसारख्या मिश्र वनस्पती तुम्ही वापरू शकता.
advertisement
असा बनवा उरलेल्या भातापासून डोसा ..
- सर्वात आधी उरलेला भात, रवा आणि दही ब्लेंडरमध्ये घाला. त्यात भिजवलेल्या काश्मिरी लाल मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या घाला.
- आता वरून मीठ आणि थोडे पाणी घालून मिश्रण चांगले बारीक ब्लेंड करा
- मिश्रण वाटताना ते एकदम गुळगुळीत वाटा. किंचित पातळ पीठ तयार करा.
advertisement
- यामध्ये दही असल्याने डोशाला हलकी आंबट चव आणि एक छान पोत येतो.
- आता मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन गरम करा. पॅन गरम झाल्यावर त्यावर एक चमचा हे डोशाचे पीठ घालून पातळ डोसा पसरवून घ्या.
- डोसा व्यवस्थित पसरवला गेला की, त्यावर थोडं तेल किंवा बटर टाका आणि मध्यम आचेवर शिजू द्या.
advertisement
- काही मिनिटांनंतर डोसा खालून सोनेरी आणि क्रिस्पी होऊ लागेल.
- जेव्हा डोसा जवळजवळ शिजेल, तेव्हा त्यावर किसलेले चीज, चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनोसारख्या मिश्र वनस्पती टाका.
- चीज वितळेपर्यंत आणि डोसा कडेने सुटू लागेपर्यंत मंद आचेवर थोडा वेळ शिजू द्या.
- यानंतर डोसा हळुवारपणे दुमडा आणि गरमागरम सर्व्ह करा.
अशाप्रकारे तुमचा उरलेल्या भाताचा गरमागरम, क्रिस्पी आणि चीझने भरलेला डोसा तयार आहे. हा डोसा तुम्ही नारळाची चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करू शकता. या युक्तीने तुमचा उरलेला भातही वाया जाणार नाही आणि तुम्हाला टेस्टी नाश्ता करायला मिळेल.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Leftover Rice Dosa : रात्रीचा भात उरलाय? फेकू नका, त्यापासून बनवा झटपट डोसा! न आंबवता बनेल टेस्टी-क्रिस्पी









