advertisement

अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, जागीच मृत्यू; शूटिंगवरून घरी परतताना गाडी डिव्हायडरवर आदळली; मनोरंजन विश्वावर शोककळा

Last Updated:

Actress Harshil Kalia Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचा जयपूरमध्ये भीषण कार अपघातात मृत्यू झाला. काम आटोपून घरी परतताना तिची कार डिव्हायडरवर आदळली आणि तिचा जागीच मृत्यू झाल.

News18
News18
जयपूर : अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचा सोमवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला. जयपूरमधील शिप्रा पाथ रोडवर हर्षिलची कार नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली आणि पलटी झाली.
ही घटना रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. काम आटोपून घरी परतताना हर्षिलची कार अचानक नियंत्रण सुटून डिव्हायडरवर आदळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार डिव्हायडरला धडकल्यानंतर डाव्या बाजूला उलटताना दिसत आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडी सरळ करून हर्षिलला बाहेर काढले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि डॉक्टरांनी हर्षिलला मृत घोषित केले.
advertisement
हर्षिल कालिया मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात खूप सक्रिय होती. तिने 'क्राइम नेक्स्ट डोअर' (Crime Next Door) या वेब सीरिजमध्ये काम केले होते आणि एका न्यूज चॅनेलमध्ये अँकरिंगही केले होते. याशिवाय तिने अनेक राजस्थानी गाण्यांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. हर्षिल मॉडेलिंग क्षेत्रात सक्रियपणे करिअर करत होती
या अपघाताची माहिती मिळताच राजस्थान पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. शिप्रा पथ पोलीस स्टेशन आणि अपघात पोलीस स्टेशन-दक्षिण या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा अपघात अतिवेगामुळे झाला की अन्य एखाद्या वाहनामुळे कार अनियंत्रित झाली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
advertisement
पोलीस या अपघाताचे नेमके कारण शोधत आहेत. गाडीचा वेग जास्त होता का किंवा दुसऱ्या वाहनाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला का, याची चौकशी सुरू आहे. दरम्यान पोलीसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, जागीच मृत्यू; शूटिंगवरून घरी परतताना गाडी डिव्हायडरवर आदळली; मनोरंजन विश्वावर शोककळा
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement