advertisement

Skin Care : उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी सहज सोपे उपाय, जाणून घ्या पपई, मध, लाल भोपळ्याचा वापर कसा करायचा

Last Updated:

ऋतू कोणताही असला तरी त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवू शकते. हवामान बदललं की त्वचा कोरडी होणं, पापुद्रे निघणं आणि खाज सुटणं सुरू होतं. बदलत्या ऋतूंमध्ये कोरड्या आणि निर्जीव त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

News18
News18
मुंबई : सध्या उन्हाचं प्रमाण वाढतंय, वाढत्या उन्हात त्वचा कोरडी होऊ शकते. काहींची त्वचा खेचल्यासारखी होते.
ऋतू कोणताही असला तरी त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवू शकते. हवामान बदललं की त्वचा कोरडी होणं, पापुद्रे निघणं आणि खाज सुटणं सुरू होतं. बदलत्या ऋतूंमध्ये कोरड्या आणि निर्जीव त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.
advertisement
भोपळ्याच्या गराचा हायड्रेशन मास्क: भोपळ्याच्या बिया हृदयाचं आरोग्य, चांगली झोप आणि पचनासाठी उपयोगी आहेत तसंच त्वचेला आर्द्रतेसाठीही उत्कृष्ट आहेत. त्यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक फायबर असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हा मास्क बनवण्यासाठी, दोन चमचे भोपळ्याच्या गरात एक चमचा मध मिसळा आणि पंधरा मिनिटं लावून ठेवा. यामुळे त्वचेवरचे कोरडे डाग कमी होतात.
advertisement
राईस जेली टोनर: राईस जेली टोनर घरी बनवण्यासाठी, तांदूळ थोड्या पाण्यात उकळा आणि पाणी गाळून घ्या जेणेकरून ते घट्ट जेलीसारखं दिसेल. हे पाणी थंड झाल्यावर, कापसानं ते घेऊन चेहऱ्यावर लावा.
advertisement
यामुळे त्वचेला थंडावा मिळेल, कोरडेपणा कमी होईल आणि त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
advertisement
पपई आणि मध: चेहऱ्यासाठी पपई आणि मधाचं मिश्रण उपयुक्त आहे. पपईमधील 'पेपेन' नावाचं एन्झाइम त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतं, तर मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. हे मिश्रण तयार करण्यासाठी, दोन चमचे पिकलेली पपई आणि एक चमचा मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर वीस मिनिटं लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : उन्हाळ्यात त्वचेच्या आरोग्यासाठी सहज सोपे उपाय, जाणून घ्या पपई, मध, लाल भोपळ्याचा वापर कसा करायचा
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement