advertisement

Ashok Kharat Property: अशोक खरातची संगत भोवली, चाकणकरांनंतर शासकीय अधिकाऱ्याची विकेट, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली

Last Updated:

अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत आले आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. 

News18
News18
नाशिक : बलात्कार प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भोंदूबाबा अशोक खरातला पोलीस कोठडी वाढवण्यात आली आाहे. पण, या प्रकरणी आता फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. अशोक खरातची संगत ठेवणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. या प्रकरणातील शासनाकडून ही पहिलीच कारवाई आहे.
अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत आले आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.  अभिजित भांडे पाटील यांची झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. अभिजित भांडे पाटील यांनी अशोक खरातसोबत गुंतवणूक केली होती.
अभिजित भांडे यांच्या पत्नीच्या नावे जमीन
अलीकडे, नाशिक जिल्ह्यातील पाथर्ली परिसरामध्ये एका शेत जमिनीचा व्यवहार समोर आला होता. ही जमीन  अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले अभिजित भांडे पाटील आणि अशोक खरात या दोघांची यामध्ये पार्टनरशीप असल्याचं उघड झालं आहे. अभिजीत पाटील   यांच्या पत्नी प्रिती भांडे पाटील आणि अशोक खरात याची मुलगी तृप्तीबाला खरात यांच्या नावावर ही शेत जमीन घेण्यात आली होती. एकत्रच पाथर्डी परिसरात ही सामायिक जमीन खरेदी केली होती. भांडे पाटील आणि अशोक खरात यांच्यामध्ये किती जवळचे संबंध होते, हे आता उघड झालं आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचे हे अधिकारी आहे, पण खरातच्या नादी लागून भांडे पाटलांनी जमिनीचा व्यवहार केल्यामुळे अडचणीत सापडले आहे.
advertisement
एसआयटीमार्फत चौकशी सुरू
दरम्यान, अशोक खरात आणि सनदी अधिकारी यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची पत्नी आणि भोंदू बाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. भोंदू बाबा अशोक खरात सोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी आहेत त्याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Property: अशोक खरातची संगत भोवली, चाकणकरांनंतर शासकीय अधिकाऱ्याची विकेट, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची बदली
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement