ऑम्लेटची गोवन चव आता ठाण्यात, तुम्ही खाल्ला आहे का हा भन्नाट पदार्थ?

Last Updated:

श्रावण महिना संपल्यानंतर अनेकजण नॉनव्हेजवर ताव मारत आहेत. पण गोवन रोस ऑम्लेट कधी ट्राय केलंय का?

+
ऑम्लेटची

ऑम्लेटची गोवन चव आता ठाण्यात, तुम्ही खाल्ला आहे का हा भन्नाट पदार्थ?

ठाणे, 28, सप्टेंबर: श्रावण महिना नुकताच संपला आहे. त्यामुळे खवय्ये नॉनव्हेज पदार्थांवर हमखास ताव मारताना दिसत आहेत. दोन महिन्यांच्या भल्या मोठ्या गॅप नंतर बाजारात नॉनव्हेज पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी होत आहे. नॉनव्हेजप्रेमी खवय्यांसाठी अगदी अंडी ते चिकन, मासे आदी चविष्ट पदार्थांचे स्टॉल बाजारात खुले झाले आहेत. ठाण्याच्या अशाच एका स्टॉलवर आता स्पेशल गोवन रोस ऑम्लेट मिळतोय.
ठाण्याच्या माजीवाडा नाका परिसरात असलेले हे 100 गॉड्स पाव स्टॉल एगीटेरियन खवययांच्या अतिशय आवडीचे बनले आहे. त्यातच या ठिकाणी साधा ऑम्लेट किंवा भुर्जी व्यतिरिक्त स्पेशल गोवन स्टाइल रोस ऑम्लेट मिळत आहे. हा रोस ऑम्लेट चिकन व अंड्यांचे एक स्वादिष्ट कॉम्बिनेशन आहे. या 100 गॉड्स पाव स्टॉलचे मालक अनिल दमसे तीन वर्षांपासून माजीवाडा नाका ठाणे या ठिकाणी विविध प्रकारचे अंड्याचे पदार्थ विकत आहेत. या ठिकाणचे मसाले हे घऱीच तयार केले जातात. त्यामुळे चवीला अगदीच घरच्या जेवणाची आठवण येईल, अशी चव ते खवय्यांना प्रदान करतात.
advertisement
कसा तयार होतो गोवन रोस ऑम्लेट?
माजीवाडा नाका परिसरात असलेल्या या रोस ऑम्लेटला ठाणेकरांची विशेष पसंती आहे. हा पदार्थ एक स्पेशल गोवन पदार्थ आहे. जो सहसा गोव्यात खाल्ला जातो. हा रोस ऑम्लेट तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. एका वाटीत अंडे फोडून त्यात कापलेला कांदा, टोमॅटो व मिरची घातली जाते. त्यात चवीनुसार मीठ व मसाले देखील घातले जातात. त्या सर्व जिन्नसला एकत्र फेटून घेतल्यानंतर गरम तव्यावर तेल गरम झाल्यास ते मिश्रण ऑम्लेट प्रमाणे पसरवले जाते.
advertisement
ऑम्लेट तयार झाल्यास त्याला एका प्लेटमध्ये सर्व्ह केले जाते. गरम असलेल्या तव्यात कांदा व खोबऱ्याचे वाटण घातले जाते आणि त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला व हळद घालून ते एकजीव केले जाते. त्यात शिजवून घेतलेले चिकनचे बोनलेस पीस घालून त्याला चांगले उकळून घेतले जाते. तयार असलेल्या रस्शाला ऑम्लेटवर सर्व्ह केले जाते. त्यावर कोथिंबीर घातली जाते. या रोस ऑम्लेटला दोन गरम पावासोबत गरम गरम खाण्यासाठी सर्व्ह केले जाते.
advertisement
या रोस ऑम्लेटची किंमत या ठिकाणी 70 रुपये प्लेट अशी आहे. पॉकेट फ्रेंडली असलेल्या या स्टॉलवर एगीटेरियन खवय्यांची गर्दी होते. अशी माहिती 100 गॉड्स पाव स्टॉलचे मालक अनिल दमसे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
ऑम्लेटची गोवन चव आता ठाण्यात, तुम्ही खाल्ला आहे का हा भन्नाट पदार्थ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement