advertisement

विसराळूपणा टाळायचाय? मधुमेह नियंत्रणात आणायचाय? तर नक्की खा हा पदार्थ

Last Updated:

सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्यदायी आहाराकडे दूर्लक्ष होतं. पण घरात हा पांढरा पदार्थ ठेवला तर अनेक फायदे होतील.

+
विसराळूपणा

विसराळूपणा टाळायचाय? मधुमेह नियंत्रणात आणायचाय? तर नक्की खा हा पदार्थ

छत्रपती संभाजीनगर, 27 सप्टेंबर : मखाना म्हणजे फुल टाइमपास आणि पौष्टिक स्नॅक आहे. हे मखाने दिसायला पॉपकॉर्न सारखेच दिसतात. ते जेवढे खायला चविष्ट असतात तेवढेच त्याचे शरीराला देखील खूप सारे फायदे होतात. मखाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला नेमके काय काय फायदे होतात? याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीय.
मखाने खाण्याचे फायदे
मखाने खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मखाना खाण्याचा फायदा होतो. या मखान्यांत भरपूर कॅल्शियम असतं आणि ते शरीरासाठी आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील ते वाढत्या वयात असतील तर त्यांना किमान दररोज दहा ते वीस ग्राम मखाने खायला द्यायला पाहिजेत. तसंच वयात येणाऱ्या मुलींनाही मखाने खायला दिले पाहिजेत. त्याचा त्यांना खूप फायदा होतो. त्याचबरोबर ज्या महिलांची मासिक पाळी जाणार आहे. त्यांना कॅल्शियमची आवश्यकता असते जर त्यांनी दररोज मखाने खाल्ले तर त्यांना या मखाण्यामधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटतं, असं कर्णिक सांगतात.
advertisement
मखाने खायचे कसे?
मखाने वेगवेगळ्या पद्धतीनं खाता येऊ शकतात. छान ड्राय रोस्ट करून ते खाऊ शकता किंवा ते तळून त्यांना बारीक करून त्यामध्ये गूळ घालून त्याचे लाडू बनवून देखील खाऊ शकता. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी दररोज आपल्या आहारामध्ये किमान एक वाटी तरी मखाना खायला पाहिजे. तुम्ही मखान्यांची ड्रायफ्रुट्स घालून खीर देखील करू शकता. मधुमेहींनी जर मखाने खाल्ले तर त्यांची जेवणानंतरची जी साखर लेव्हल असते ती आटोक्यात यायला मदत होते, असंही आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
विसराळूपणा टाळण्यासाठी मखाना लाभदायी
ज्यांना विसराळूपणा येतो किंवा प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते अशा लोकांनी देखील मखाना खायला पाहिजे. यातून त्यांना कॅल्शियम भेटतं आणि ते त्यांना उपयुक्त ठरतं. विद्यार्थ्यांनी देखील मखाण्याचा खूप उपयोग करायला पाहिजे. तुम्हाला जशा पद्धतीने मखान्यांचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने करू शकता. पण प्रत्येक व्यक्तीने किमान दिवसभरामध्ये एक वाटी तरी मखान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे, असे आहारतज्ज्ञ कर्णिक सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती आहार तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Food/
विसराळूपणा टाळायचाय? मधुमेह नियंत्रणात आणायचाय? तर नक्की खा हा पदार्थ
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement