advertisement

चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी करा 'हे' उपाय, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

चाळीशी ओलांडल्यानंतर आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू होतो. या टप्प्यात महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर : घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्याचं काम घरातील महिला करत असतात. घरातील कामांसोबतच नोकरी आणि व्यवसायामध्येही महिला आघाडीवर आहेत. मात्र, या सर्व पातळ्यांवर धावपळ करत असताना अनेकदा महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडं दुर्लक्ष होते. चाळीशी ओलांडल्यानंतर आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू होतो. या टप्प्यात महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? विशेषत: त्यांचा आहार कसा असावा? याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी दिली आहे.
या महिलांच्या आहारात फायबर, प्रोटीन असणारे घटक तसंच पालेभाज्या यांचा समावेश हवा. मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावं तसंच मनुके चघळून खावेत. त्यामुळे इम्युनिटी वाढते. एक गाजर, आवळा आणि बीट रस हे पदार्थ तुम्ही सकाळी नाष्टानंतर सूप म्हणून पिऊ शकता. त्याचबरोबर एक टोमॅटो सालीसह खावे. त्याचे सूपही तुम्ही पिऊ शकता. त्याचबरोबर कोथिंबिरचा सूपही इम्युनिटी वाढवण्यासाठी फायदेशीर आहे, असं कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीयेत? कारण जाणून घ्या आणि जीवनशैलीत करा बदल, होईल फायदा
दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. कॅल्शियम असणाऱ्या घटकांचे प्रमाण आहारामध्ये जास्त असावे. त्यासाठी तुम्ही रोज दूध पिऊ शकता. या दुधामध्ये एक चमचा खारीक पावडर टाकली तर हाडांचा त्रास कमी होतो,असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
तुम्हाला थकवा जाणत असेल तर दोन खजूर हे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी पाण्यासकट ते खजूर खावे.
Health tips : सकाळी उठल्यावर फक्त 'ही' पेयं प्या, वजन तर कमी होईल पण...
त्याचबरोबर आहारामध्ये जास्तीत जास्त कडधान्य आणि नाचणीचा समावेश हवा. त्याचबरोबर रोज फळ आवर्जुन खावे किंवा फळाचा रस घ्यावा. हा आहार चाळीसीनंतर महिलांनी ठेवला तर त्याचा फायदा होईल, असे कर्णिक यांनी स्पष्ट केला.
advertisement
(टीप : या बातमीतील मत ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी करा 'हे' उपाय, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement