सतत मोबाईल वापरल्यानं होतो 'हा' गंभीर आजार, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Last Updated:

तुम्हाला सतत मोबाईल वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर : अन्न वस्त्र, निवारा या जगण्यासाठी आवश्यक तीन मुलभूत गरजा आहेत. त्याचबरोबर मोबाईल हा देखील अनेकांसाठी आवश्यक घटक बनलाय. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, झोपेतून जाग आल्यानंतरही प्रत्येक वेळी मोबाईल चेक करण्याचं अनेकांना व्यसन असतं. विशेषत: तरुणांमध्ये हे प्रमाण खूप आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. लॉकडाऊन पूर्वी मानसोपचार तज्ज्ञांकडे महिन्याला येणाऱ्या 100 रुग्णापैकी 15 रुग्ण अँड्रॉईड मेनिया आजाराची लक्षणे असलेली होती. आता हे प्रमाण 30 ते 35 वर आले आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरशहरामधील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी दिली आहे.
advertisement
सध्या स्वस्तात आणि सहज उपलब्ध झालेले तंत्रज्ञान गरजेपेक्षा सवय बनलंय.  त्यात तरुणाईची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दुःखही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा ट्रेंड सध्या चालू आहे. ऑनलाइन गेमिंग तरुण वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात खेळत आहे. त्यामुळे या जीवनशैलीचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतोय.
आत्मीयता, संवेदनशीलता आणि एकमेकांवरील विश्वासाचे नाते हरवल्याने स्वसंवादासह कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी प्रत्यक्ष तरुणाई हरून बसल्याने अँड्रॉइड मेनिया संख्या वाढत आहे.त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होत यावर नियंत्रणासाठी प्रयत्न करावा आणि प्रत्यक्ष संवादावरती भर द्यावा, असं डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.
advertisement
काय आहे उपाय?
मोबाईलसाठी एक ठराविक वेळ हा तरुणांनी द्यायला पाहिजे. त्याचबरोबर एकमेकांमधील संवाद वाढावा विशेषतः रात्री जास्त मोबाईलचा वापर करू नये. यामुळे आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, असंही डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
सतत मोबाईल वापरल्यानं होतो 'हा' गंभीर आजार, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement