ठाणे : शोर्मा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. ठाण्यामध्ये असेच एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जिथे मिळणारा शोर्मा हा ठाणेकरांच्या पसंतीस उतरला आहे. ठाणे स्टेशनपासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणारे तरकिष शोर्मा हे दुकान तरुणांचे आवडीचे दुकान झालेले आहे.
इथे हा तरकिष शोर्मा खाण्यासाठी कायमच गिऱ्हाईकांची गर्दी असते. इथे तुम्हाला मिळणारा शोर्मा हा उत्तम चवीचा आहे. त्यामुळेच या दुकानात कायम गर्दी असते. या शोर्मा सोबतच तरकिष या दुकानातील ट्रिपल लेयर चिकन चीज मेल्टिंग सँडविचसुद्धा मिळते. याची किंमत तर फक्त 160 रुपयांपासून सुरू होते.
advertisement
चीज सँडविच सोबतच इथे चिकन बर्गर आणि पेरी पेरी पॉपकॉर्न सुद्धा मिळतात. या दुकानात कॉम्बो ऑफर सुद्धा उपलब्ध असल्याने तुम्ही कॉम्बोमध्ये एखादा पदार्थ मागवला तर तो तुम्हाला स्वस्त मिळेल. याठिकाणी दोन शोर्माची किंमत तर फक्त 140 रुपये आहे.
Independence Day Special : पुण्यात साकारली ऑलम्पिक आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंची रांगोळी, VIDEO
'आम्ही नोव्हेंबरमध्ये या दुकानाची सुरुवात केली. शोर्मा तर अनेक ठिकाणी मिळतो. मात्र, आमच्याकडे मिळणाऱ्या पदार्थाची चव इतरांपेक्षा अगदी वेगळी आहे. त्यामुळे आमच्या इथे खवय्यांची कायम गर्दी असते,' असे दुकानदार उसंबल काझी यांनी सांगितले.
ठाण्यातील पाचपाखाडी येथे असणारा हा तरकिष शोर्मा युनिक आणि चविष्ट असल्यामुळे ठाणेकर इथे कायम येतात. तर मग तुम्हालाही मस्त पेरी पेरी चिकन पॉपकॉर्न, बर्गर, चीज मेल्टिंग सँडविच असे पदार्थ खायचे असतील तर तुम्हीही ठाण्यातील या दुकानाला नक्की भेट देऊ शकतात.