मुंबई : पाणीपुरी हा देशभरातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांत तिला पुचका, गोलगप्पा, बताशा अशा नावांनी ओळखले जाते. प्रत्येक ठिकाणी तिची चव आणि बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते. कुठे आंबट पाणी, कुठे तिखट, तर कुठे गोडसर पाण्यासोबत पाणीपुरी दिली जाते.
advertisement
मुंबईतील खाद्यप्रेमींसाठी मोठी मेजवानी!
मुंबईत सहसा पुदिन्याचे किंवा जलजीऱ्याचे हिरव्या रंगाचे पाणी वापरले जाते. मात्र आता मुंबईत एक वेगळ्याच प्रकारची पाणीपुरी चर्चेत आली आहे. बोरिवलीतील चौपाटी वाइब्स या ठिकाणी जांभळ्या रंगाची पाणीपुरी मिळते. इथे पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी पुदिना किंवा लिंबूपासून नाही, तर बेरी फळांपासून तयार केले जाते. त्यामुळे पाणी जांभळ्या रंगाचे आणि चवीला गोड असते. हा अनोखा प्रकार पाहण्यासाठी आणि चाखण्यासाठी दररोज संध्याकाळी मोठी गर्दी होते.
या पाणीपुरीमध्ये नेहमीच्या बटाट्याच्या भाजीऐवजी उकडलेले मूग आणि बुंदीचा वापर केला जातो. त्यामुळे ही पाणीपुरी हलकी, रसाळ आणि वेगळी लागते. विशेषतहा मुलांमध्ये ही पाणीपुरी खूप लोकप्रिय आहे. एका प्लेटची किंमत 50 रुपये आहे.
याशिवाय मुंबईतील वांद्रे भागात अल्को पाणीपुरी देखील प्रसिद्ध आहे. ही मुंबईतील सर्वात महागडी पाणीपुरी मानली जाते. एका प्लेटची किंमत 90 रुपये असून त्यात फक्त 6 पाणीपुरी मिळतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येथे पाणीपुरी खाण्यासाठी आले आहेत. वेगळ्या चवीमुळे ही पाणीपुरी सोशल मीडियावरही चर्चेत आहे.
