थंडीत खोबरेल तेल का आळतं? जास्त किंमतीची तेलं का आळत नाहीत, नेमकं कारण काय? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं.
पुणे: महाराष्ट्रभरात सध्या चांगलीच कडाक्याची थंडी जाणवत आहे. अनेक भागांत एक अंकी तापमानाचीही नोंद झाली आहे. थंडी सुरू झाली की अनेक जण गंमतीने म्हणतात, खोबरेल तेल आळून बसलं कीच खरी थंडी पडली असं समजायचं. विशेषत: घराघरांत वापरलं जाणारं पॅरॅशूट खोबरेल तेल थंडीत घट्ट होतं. मात्र, यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. खोबरेल तेल थंडीत आळून बसतं, पण बदाम तेल किंवा इतर खाद्यतेलांवर थंडीचा फारसा परिणाम का होत नाही? कितीही थंडी पडली तरी ही तेलं द्रवरूपातच का राहतात? खोबरेल तेल आळून बसण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि इतर तेलांवर त्याचा परिणाम का होत नाही, याविषयीच आपण जाणून घेणार आहोत.
नेमकं कारण काय?
खोबरेल तेल आळून बसण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यातील फॅटचा प्रकार. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं की हे तेल घट्ट होतं आणि आळून बसतं. याउलट शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि बदाम तेलामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. या प्रकारच्या फॅटमुळे थंडीतही ही तेलं द्रवरूपातच राहतात आणि त्यांचं स्वरूप बदलत नाही.
advertisement
म्हणूनच थंडीच्या दिवसांत खोबरेल तेल आळलेलं दिसतं, तर शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि बदाम तेल द्रवरूपातच राहतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे तेलातील फॅटचा प्रकार. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्यामुळे थंडी वाढली की ते घट्ट होतं. मात्र इतर तेलांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने थंडीतही त्यांच्या स्वरूपात फारसा बदल होत नाही.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 5:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
थंडीत खोबरेल तेल का आळतं? जास्त किंमतीची तेलं का आळत नाहीत, नेमकं कारण काय? Video








