1 जानेवारी... मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस, 213 लोकांचा झाला होता मृत्यू; असं काय घडलं होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
1 January Mumbai Plane Crash : 1 जानेवारी सगळीकडे नवीन वर्षाचा उत्साह आहे. पण मुंबईत मात्र याच दिवशी अशी घटना घडली होती, जे काही जण अजूनही विसरलेले नाहीत.
1 जानेवारी, नवीन वर्षाचा पहिला दिवस, सगळ्यांनी नववर्षाचं उत्साहात स्वागत केलं. अगदी मुंबईतही पार्टी करून न्यू इअर सेलिब्रेशन होतं आहे. पण मुंबईच्या इतिहासात मात्र हा एक काळा दिवस आहे. बरोबर 48 वर्षांपूर्वी याच दिवशी एक अशी घटना घडली होती, जी कधीच विसरता येणार नाही. तब्बल 213 लोकांनी आपला जीव गमावला होता.
advertisement
1 जानेवारी 1978 ची रात्र... मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून रात्री 8 वाजता एअर इंडियाच्या सम्राट अशोक या विमानाने उड्डाण केलं. एअर इंडियाने 1971 मध्ये खरेदी केलेलं हे पहिलं बोईंग 747. त्याचं नाव मौर्य सम्राट अशोक यांच्या नावावर ठेवण्यात आलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते एअर इंडियाच्या महाराजा-थीम असलेल्या लक्झरी ताफ्यातील पहिलं विमान होतं.
advertisement
advertisement
advertisement









