advertisement

Gold Silver Prediction: या आठवड्यात कसे राहणार सोन्या चांदीचे दर, घसरणार की वाढणार?

Last Updated:

MCX वर चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीही कमी. अमेरिकेतील आर्थिक आकडेवारीवर बाजारपेठेचा परिणाम. ग्राहकांचा १८ आणि १४ कॅरेट सोन्याकडे कल वाढला.

News18
News18
Gold Silver Price Prediction: सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरतेने सध्या सराफा बाजारात खळबळ माजली आहे. गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे तर खरेदीदरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दरात सतत चढ उतार पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात ही घसरण अधिक होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे, जीडीपी आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणांकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले असून, त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होणार आहे.
या आठवड्यात काय होणार?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी सोन्याच्या भावी हालचाली ठरवतील. जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष प्रणव मेर यांच्या मते, अमेरिकेच्या वैयक्तिक उपभोग खर्च आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या विधानांमुळे बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. जर अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेत मिळाले, तर सोन्याच्या किमतीत अधिक घसरण पाहायला मिळू शकते.
advertisement
दरातील मोठी घसरण
गेल्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात MCX वर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीचे भाव ५,५३२ रुपये म्हणजेच सुमारे २.२ टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे सोन्याच्या भावात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. एंजेल वनचे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारीपर्यंत सोन्याच्या किमती १,८०,००० रुपयांच्या विक्रमी स्तरावरून घसरून १,५३,८०० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आल्या आहेत.
advertisement
ग्राहकांची स्मार्ट खेळी
सोनं महाग झालं तरी भारतीय ग्राहकांची सोन्याप्रती असलेली ओढ कमी झालेली नाही. उलट, आता ग्राहकांनी आपली खरेदीची पद्धत बदलली आहे. 'टाइटन कंपनी'चे एमडी अजय चावला यांनी सांगितले की, ग्राहक आता शेअर बाजारातील गुंतवणूकदारांप्रमाणे वागत आहेत. पूर्वी ग्राहक सोने महाग झाल्यावर भाव कमी होण्याची वाट पाहत थांबायचे.
आता मात्र, भाव थोडे जरी कमी झाले तरी ग्राहक ती संधी मानून लगेच खरेदी करत आहेत. दरात सतत बदल होत असले तरीसुद्धा लोक सोनं खरेदी करत आहेत. जिथे २२ कॅरेट घेत होते तिथे आता १८ आणि १४ कॅरेट सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल आहे.
advertisement
गुंतवणूकदारांनी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील व्याजदर कपातीचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याने सोन्यावर दबाव राहील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाई न करता वेट अँड वॉचची भूमिका घेणे फायदेशीर ठरेल. मात्र, ज्यांना लग्नसराईसाठी खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी दर घसरणे ही एक चांगली संधी असू शकते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Prediction: या आठवड्यात कसे राहणार सोन्या चांदीचे दर, घसरणार की वाढणार?
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement