अहिल्यानगरमध्ये मोठा घात, मनसेचे दोन उमेदवार गायब; प्रचाराला गेले अन्...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निवडणुकीच्या मैदानात उतरेलल्या मनसेच्या दोन उमेदवार गायब झाल्याने मोठी खबळ उडाली आहे.
अहिल्यानगर : राज्यात महापालिका निवडणुकींचा धुराळा उडाला असून प्रचाराने देखील वेग घेतला आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अनेक ठिकाणी बिनवरोध उमेदवार निवडून आले आहे. दरम्यान अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर आले आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरेलल्या मनसेच्या दोन उमेदवार गायब झाल्याने मोठी खबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील प्रभार क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे दोन उमेदवार गायब झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून यापैकी एकाचाही कुटुंबियांशी संपर्क झालेला नाही. मनसे जिल्हाध्यक्षांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही उमेदवार अचानक गायब झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आहे. कारण केडगाव हा अतिशय संवेदनशील भाग आहे. गायब झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांसमोर निवडणुकीच्या मैदानात असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नातेवाईक चिंतेत आहे. गायब उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे.
advertisement
प्रचाराला बाहेर पडले अन्...
मनसे विद्यार्थी सेनेचे सुमीत वर्मा म्हणाले, मनसेचे उमेदवार हे मागील २४ तासांपासून गायब आहेत. ते प्रचारासाठी पक्षाचे साहित्य घेऊन बाहेर पडले होते. परंतु पक्ष कार्यालयात चौकशी केली तर ते प्रचाराल देखील गेले नसल्याचे समोर आले आहे. घरी, नातेवाईकांकडे चौकळी केली मात्र गेल्या २४ तासात त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. त्यांचे काही बरे वाईट झाले असतील तर त्याला जबाबदार कोण?
advertisement
केडगावचा निवडणुकांचा इतिहास रक्तरंजित
केडगावचा इतिहास हा भाग अतिशय संवेदनशील असून इथे रक्तरंजित निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे उलसुलट चर्चांना उधाण आले आहे. अहिल्यानगमध्ये 17 प्रभागांमध्ये 68 जागांसाठी 15 जानेवारीला निवडणूक पार पडणाप आहे. महायुती फिस्कटली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. तर काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी ३४ तर भाजप ३२ जागांवर लढणार आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 5:13 PM IST










