वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांना पुण्यात झटका, निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याने गावकऱ्यांचा मोठा निर्णय
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पाषाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रमोद निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे : पुणे महापालिका निवडणुकांसाठी जवळपास सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या याद्या जाहीर केल्या आहेत. काही आयारामांना संधी दिली आहे तर काही ठिकाणी माजी नगरसेवकांची देखील तिकिट कापली आहे. पाषाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीने प्रमोद निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या निर्णयाविरोधात पाषाणमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रमोद निम्हण हे निवडणूक लढवण्यास इच्चुक होते. निवडणुकीसाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने बाबुराव चांदेरे यांना उमेदवारी देण्यात आली. या अचानक झालेल्या बदलामुळे नागरिकांना तीव्र संताप व्यक्त केला आणि बाबुराव चांदेरे यांच्या उमेदवारीला विरोध केला.चांदेरे यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा ग्रामस्थांनी निषेध केला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत संतप्त भावना पोहोचवण्यासाठी आणि प्रमोद निम्हण यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला आहे.
advertisement
काय म्हणाले प्रमोद निम्हण?
जनतेचा आवाज दाबता येत नाही… न्यायासाठीची लढाई थांबणार नाही! असे म्हणत ब प्रमोद निम्हण यांनी देखील समाज माध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रमोद निम्हण म्हणाले, जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रमोद निम्हण यांच्या समर्थनार्थ आज पाषाण परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळत आपला ठाम निषेध नोंदवला.हा बंद म्हणजे केवळ आंदोलन नाही, तर अन्यायाविरोधातील लोकशक्तीचा आवाज आहे. पाषाणमधील नागरिकांनी शांततेच्या मार्गाने एकजूट दाखवत लोकशाही मूल्यांवरचा आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला.या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. जनतेच्या भावना, न्याय आणि सत्याच्या बाजूने आम्ही सदैव ठामपणे उभे राहू.
advertisement
अजित पवार नाराजी कशी दूर करणार?
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाषाण परिसररातील सर्व दुकाने बंद आहे. अचानक पुकारल्याने या बंदामुळे पुण्यात मोठ खळबळ उडाली असून अजित पवार नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 4:21 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवारांना पुण्यात झटका, निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याने गावकऱ्यांचा मोठा निर्णय









