ठरलं तर मग! नवीन वर्षात उडवायचाय लग्नाचा बार, फेब्रुवारी महिन्यात आहेत 12 शुभं मुहूर्त; वाचा तिथी

Last Updated:

नवीन वर्ष 2026 ला सुरुवात झाली असून, अनेकांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या सोहळ्याचे, म्हणजेच लग्नाचे प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. हिंदू संस्कृतीत लग्नासारख मंगल कार्य करण्यासाठी 'शुभ मुहूर्त' पाहणे अत्यंत आवश्यक मानले जाते.

News18
News18
Wedding Shubh Muhurt 2026 : नवीन वर्ष 2026 ला सुरुवात झाली असून, अनेकांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या सोहळ्याचे, म्हणजेच लग्नाचे प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. हिंदू संस्कृतीत लग्नासारख मंगल कार्य करण्यासाठी 'शुभ मुहूर्त' पाहणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जानेवारी महिन्यात 15 तारखेपर्यंत 'खरमास' असल्याने शुभ कार्ये वर्ज्य होती, मात्र फेब्रुवारी महिना लग्नाचे सनई चौघडे वाजवण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. पंचांगानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये लग्नासाठी तब्बल 12 शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. जर तुम्हीही यंदा बोहल्यावर चढणार असाल, तर या तारखा नक्की नोंदवून ठेवा.
फेब्रुवारी 2026 मधील 12 शुभ विवाह मुहूर्त आणि तिथी
फेब्रुवारी महिन्यात विवाहासाठी अनेक उत्तम नक्षत्रांचा संयोग जुळून येत आहे. पंचांगानुसार खालील 12 तारखा विवाहासाठी अत्यंत शुभ आहेत.
दिनांक              वार                  मुहूर्त विशेष
3 फेब्रुवारी       मंगळवार          माघ पौर्णिमा प्रारंभ/नक्षत्र योग
5 फेब्रुवारी       गुरुवार             उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
6 फेब्रुवारी       शुक्रवार             हस्त नक्षत्र
7 फेब्रुवारी       शनिवार            उत्तरा फाल्गुनी/हस्त नक्षत्र
advertisement
8 फेब्रुवारी       रविवार             स्वाती नक्षत्र
10 फेब्रुवारी     मंगळवार         अनुराधा नक्षत्र
11 फेब्रुवारी     बुधवार            अनुराधा/ज्येष्ठा नक्षत्र
12 फेब्रुवारी     गुरुवार            मूळ नक्षत्र (विजया एकादशी)
20 फेब्रुवारी     शुक्रवार           उत्तरा भाद्रपदा नक्षत्र
22 फेब्रुवारी     रविवार            रेवती नक्षत्र
25 फेब्रुवारी     बुधवार             मृगशीर्ष नक्षत्र
26 फेब्रुवारी     गुरुवार             मृगशीर्ष नक्षत्र
क्षत्रांचा शुभ प्रभाव: फेब्रुवारी महिन्यात हस्त, स्वाती, अनुराधा आणि मृगशीर्ष यांसारखी विवाहासाठी सर्वोत्तम मानली जाणारी नक्षत्रे येत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या नक्षत्रांमध्ये विवाह केल्याने पती-पत्नीमधील सामंजस्य आणि प्रेम कायम टिकून राहते.
advertisement
गुरुबळाची साथ: 2026 मध्ये 'देवगुरू बृहस्पती' आपल्या उच्च राशीत विराजमान आहेत. लग्नासाठी गुरुबळ असणे अत्यंत आवश्यक असते. या काळात गुरूबळ प्रबळ असल्याने वधू-वरांच्या वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी लाभण्याचे दाट योग आहेत.
माघ आणि फाल्गुन महिन्याचा संगम: फेब्रुवारीतील हे मुहूर्त माघ आणि फाल्गुन या दोन पवित्र महिन्यांमध्ये येत आहेत. हे दोन्ही महिने देवकार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात, ज्यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात.
advertisement
रविवारचे विशेष मुहूर्त: बऱ्याचदा नोकरी-व्यवसायामुळे लग्नासाठी रविवारची निवड केली जाते. फेब्रुवारी महिन्यात 8 आणि 22 फेब्रुवारी हे दोन रविवार लग्नासाठी शुभ आहेत, ज्यामुळे पाहुण्यांची उपस्थिती आणि सोहळ्याचे नियोजन सोपे होऊ शकते.
शुक्र ग्रहाची अनुकूलता: लग्नासाठी शुक्र ग्रहाचा उदय असणे अनिवार्य असते. फेब्रुवारी महिन्यात शुक्र ग्रह अनुकूल स्थितीत असल्याने लग्नाचा बार उडवण्यासाठी कोणताही अडथळा नाही.
advertisement
सावधगिरी आणि कुंडली मिलन: जरी हे मुहूर्त सर्वसाधारणपणे शुभ असले, तरी प्रत्येक व्यक्तीच्या राशीनुसार काही नक्षत्र 'वर्ज्य' असू शकतात. त्यामुळे लग्नाची तारीख पक्की करण्यापूर्वी वधू-वरांच्या कुंडलीतील गुणमेलन आणि वैयक्तिक ग्रहांची स्थिती आपल्या फॅमिली पुरोहितांकडून तपासून घेणे श्रेयस्कर ठरते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
ठरलं तर मग! नवीन वर्षात उडवायचाय लग्नाचा बार, फेब्रुवारी महिन्यात आहेत 12 शुभं मुहूर्त; वाचा तिथी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement