Human Body Facts : तुमच्या शरीरात किती छिद्रं? आकडा वाचून विश्वास बसणार नाही; महिलांमध्ये तर पुरुषांपेक्षा जास्त

Last Updated:
Hole In Human Body Facts : मानवी शरीरात किती छेद आहे आणि कुठे कुठे आहेत असं विचारलं तर... सामान्यपणे कित्येक जण तोंड, नाक, कान, डोळे, गुदद्वार शरीराच्या या भागांची नावं घेईल. पण वैज्ञानिक आणि गणितज्ज्ञांच्या मते याचं उत्तर थोडं वेगळं आहे.
1/5
तुम्हारे शरीर मे इतने छेद कर देंगे की... हा फिल्मी डायलॉग तुम्हाला माहितीच आहे... पण प्रत्यक्षात मानवी शरीरात किती छिद्र असतात? याचा तुम्ही विचार केला आहे का? सामान्य भाषेत छेद म्हणजे एखादी मोकळी जागा किंवा खड्डा. पण गणिती भाषेत विशेषत: गणितीची एक शाखा असलेल्या टोपोलॉजीनुसार छेद म्हणजे पूर्ण आरपार जाणारा भाग. जसं की डोनट असतो. ज्यात बोट आरपार जातं, त्यात फिरवू शकतो. टोपोलॉजिस्टच्या मते, स्ट्रॉ ज्यात आपल्याला दोन छेद दिसतात पण प्रत्यक्षात तो एकच छेद आहे जो आरपार जातो. म्हणजे एका टोकाला दोरी टाकून तुम्ही दुसऱ्या टोकाने बाहेर काढू शकता.

advertisement
2/5
शरीराचं म्हणाल तर तोंड, नाकातील दोन, डोळ्यांमध्ये वरखाली अश्रू नलिका ज्या नाकाशी जोडलेल्या आहेत. कानाचा छेद जो आरपार जात नाही पण कानाच्या पडद्याजवळ थांबतो. त्वचेवरील छिद्र जे लाखोंच्या घरात आहेत. पण तेही आरपार जात नाहीत. मूत्रमार्ग जो किडनीपर्यंत जातो पण आरपार नाही

3/5
टोपोलॉजीनुसार तोंड, नाकाचे छेद आणि अश्रूनलिका आतून जोडलेल्या आहेत. हे पचनतंत्र, नाक आणि सायनसशी जोडून एक सिस्टम बनवतात.  बाहेरून एक तोंड, नाकाचे दोन, अश्रू नलिका 4 आणि गुदद्वार असे एकूण 8 छेद जे खुले आहेत पण आत जोडलेला असल्याने एक छेद कमी होतो. जसं अंडरविअरमध्ये कमर आणि दोन पाय असे एकूण 3 छेद, पण टोपोलॉजीनुसार फक्त 2. त्यामुळे मानवी शरीरात फक्त 7 छेद असल्याचं मानलं जातं.

4/5
महिलांचं म्हणाल तर महिलांमध्ये व्हजायना ते गर्भाशय आणि दोन फॅलोपियन ट्युब जोडलेली असते. ही ट्युब पोटातील पेरिटोनियल कॅविटीमध्ये खुली होते काही वैज्ञानिकांच्या मते यामुळे एक अतिरिक्त छेद बनतो. त्यामुळे महिलांमध्ये 8 छेद असू शकतात. पण बहुतेक तज्ज्ञ याला वेगळं मोजत नाहीत कारण हे पूर्णपणे जोडलेलं नसतं.

5/5
एकंदर काय तर  मानवी शरीरातील छिद्र म्हणजे स्वीस चीजसारखी नाहीत तर डोनेटवरील छिद्रासारखं आहे. त्यामुळे यापुढे कुणी विचारलं की मानवी शरीरात किती छिद्र तर लाइव्ह सायन्सवरील रिपोर्टनुसार वैज्ञानिकदृष्ट्या याचं उत्तर 7 आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement