Success Story : 30 गुंठ्यात केली शेती, 4 महिन्यात मिळालं दिड लाख उत्पन्न, असं काय केलं?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द गावातील शेतकरी बाळकृष्ण आटोळे हे गेल्या 10 वर्षांपासून फुलशेती व्यवसायात आहेत. 30 गुंठे क्षेत्रामध्ये झेंडूची लागवड त्यांनी केली आहे. जळगाव, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आटोळे यांचा झेंडू पार्सलद्वारे विक्री केला जातो. या झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून यंदाच्या पहिल्या 2 महिन्यातच 70 हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याचे बाळकृष्ण आटोळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
शिरोडी खुर्द येथे बाळकृष्ण आटोळे यांनी झेंडू झाडांची 13 ऑगस्ट 2025 रोजी झेंडू फुलाची लागवड केली. याबरोबरच विविध प्रकारच्या फुलांची लागवड दरवर्षी केली जाते. या फुलांच्या झाडांसाठी पाणी ठिबकद्वारे देण्यात येते. तसेच या झाडांवर अळी किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो. तरुण शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग केले पाहिजेत आणि फुलशेतीकडे यायला काहीच हरकत नाही, कारण की या शेतीमध्ये मेहनत घेतल्यास व योग्य नियोजन केल्यास उत्पन्न चांगले मिळते.
advertisement
पारंपारिक पिकातील मका, कापूस, सोयाबीन या पिकांपेक्षा फुलशेती फायदेशीर आहे. या शेतीतून बाजारात गेल्यानंतर दररोज पैसे मिळतात. आमच्या शेतातील झेंडू फुले छत्रपती संभाजीनगर बाजारात विक्री केली जातात, तसेच जास्त उत्पादन राहिल्यास जळगाव, पुणे यांसारख्या ठिकाणी पार्सलद्वारे विक्री केली जाते. या पिकातून आणखी दीड ते दोन महिने उत्पादन घेता येईल, असे एकूण 4 महिन्यात 1.50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे देखील आटोळे यांनी म्हटले आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 4:20 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : 30 गुंठ्यात केली शेती, 4 महिन्यात मिळालं दिड लाख उत्पन्न, असं काय केलं?









