मुंबईचं सुपरहिट स्ट्रीट फूड
दादरमध्ये कुठेही चांगला वडापाव कुठे मिळतो? असा प्रश्न विचारला तर अनेक मुंबईकर न चुकता किर्ती कॉलेजजवळील वडापावचं नाव घेतात. वर्षानुवर्षे टिकून असलेली चव, दर्जा आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे हा वडापाव आजही लोकप्रियतेत आहे. पिढ्यानपिढ्या अनेकांनी इथल्या वडापावची चव अनुभवली असून त्याचा खास ठसा मुंबईकरांच्या मनात कायमचा उमटलेला आहे.
advertisement
सेलिब्रिटींचाही फेव्हरेट वडापाव
किर्ती कॉलेजजवळ मिळणारा 'अशोक वडापाव' हा केवळ एक साधा वडापाव नसून तो एक अविस्मरणीय खाद्यअनुभव आहे. इथं रोजच मोठी गर्दी पाहायला मिळते. कॉलेजमधील विद्यार्थी, आजूबाजूच्या ऑफिसमध्ये काम करणारे नोकरदार तसेच शहरातील अनेक नामांकित व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटीदेखील या वडापावचे चाहते आहेत. त्यामुळेच या वडापावची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते.
एकदा चव घेतली की पुन्हा पुन्हा याल
या वडापावची खरी ओळख म्हणजे त्याची खास लाल चटणी. तिखट, चवदार आणि अगदी योग्य प्रमाणात मसालेदार असलेली ही चटणी वडापावला वेगळीच लज्जत देते. यासोबतच इथं मिळणारा कुरकुरीत चुरा पावदेखील तितकाच प्रसिद्ध आहे. अनेक जण खास हा चुरा पाव खाण्यासाठी इथे येतात.
नावाप्रमाणेच हा वडापाव थोडा हटके असून त्याची चव इतर वडापावांपेक्षा वेगळी आहे. रोज लागणारी गर्दी पाहिली की या वडापावची लोकप्रियता सहज लक्षात येते.
