अचानक पाहुणे घरी आले की काय बनवायचं, हे या व्हिडीओत सांगितलं आहे. फक्त 5 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही संपूर्ण जेवण फक्त 30 मिनिटांत बनवू शकता. काय वाचून आश्चर्य वाटलं आहे ना तुम्हाला? आता हे कसं शक्य आहे ते पाहुयात.
Brinjal Recipe : भरल्या वांग्याचा नवा प्रकार खवा वांगी; विचित्र कॉम्बिनेशन पण चवीला अप्रतीम
advertisement
जिरा राइस
तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. तेलात जिरं, कढीपत्ता, पाणी, मीठ आणि तांदूळ टाकून शिजवून घ्या.
खीर
तुपात शेवया लालसर भाजून घ्या. यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून भाजून घ्या. तांदूळ भिजवून त्याची पेस्ट करून शिजवून घ्या. आता यात दूध घाला. दुधाला उकळी आली की साखऱ टाका, ड्रायफ्रुट्स टाका आणि उकळी काढा. खीर तयार
भाजी
कढईत तेल घाला. जिरे मोहरी टाका. बारीक चिरलेला टाका. आलं-लसूण पेस्ट तेलात परतून घ्या. कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो. उकडलेला बटाटा चिरून टाका. लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ घालून थोडं पाणी टाकून एक उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर टाका. भाजी तयार. ही भाजी भात आणि पुरी दोघांसोबत जाईल. वेगळी आमटी किंवा वरण बनवण्याची गरज नाही. इथंही तुमचा वेळ वाचतो.
Egg Recipe : फक्त एकच अंडं, त्यापासून 4 जणांचं जेवण कसं करायचं? अंड्याची भन्नाट रेसिपी
पुरी
गव्हाचं पीठ त्यात मीठ टाकून थोडंथोडं पाणी टाकून घट्ट मळून घ्या. तेल लावून पुऱ्या लाटून घ्या. कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्या. याच तेलात पापड किंवा कुरडया तळून घ्या.
पाहुण्यांसाठी संपूर्ण जेवण तयार आहे. ताट वाढ आणि सर्व्ह करा.
