TRENDING:

चवीला टेस्टी आणि पचायला हलका! श्रावणी सोमवार स्पेशल उपवासाचा ढोकळा

Last Updated:

Fasting Food : श्रावणी सोमवारी आवर्जून उपवास पाळून महादेवांची मनोभावे पूजा केली जाते. आपणही श्रावणी सोमवारी उपवास करत असाल तर पौष्टिक असा ढोकळा नक्कीच बनवून खाऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, शेंगदाण्याची आमटी, भगर असे कितीतरी पदार्थ आपण उपवासाला आवडीने खातो. तुम्ही कधी उपवासाचा ढोकळा खाल्लाय का? श्रावणी सोमवारानिमित्त ट्राय करायला काही हरकत नाही. हा ढोकळा पचायला हलका आणि चवीला स्वादिष्ट असतो. जाणून घेऊया उपवासाच्या या खमंग ढोकळ्याची रेसिपी दीप्ती खाडे यांच्याकडून.

संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो. त्यामुळे श्रावणी सोमवारी आवर्जून उपवास पाळून महादेवांची मनोभावे पूजा केली जाते. आपणही श्रावणी सोमवारी उपवास करत असाल तर पौष्टिक असा ढोकळा नक्कीच बनवून खाऊ शकता.

advertisement

उपवासाच्या ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य :

  • अर्धा कप भगर (वरई)
  • अर्धा कप साबुदाणे
  • अर्धा कप दही
  • अर्धा कप पाणी
  • आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट
  • अर्धा टीस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • फोडणीसाठी 1 टीस्पून तेल आणि 1 टेबलस्पून जिरं

उपवासाचा ढोकळा बनवण्याची कृती :

भगर, साबुदाणे, आलं-हिरव्या मिरचीची पेस्ट, साखर, मीठ आणि दही व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. त्यात पाणी घालावं. मिश्रण पूर्ण एकजीव व्हायला हवं. चांगलं भिजल्यावर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर ढोकळ्याच्या भांड्यात हे सारण घेऊन शिजवा. वाफ येऊद्या. मग चौकोनी आकारात कापून घ्या. त्यावर फोडणी घाला.

advertisement

फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता छान तडतडू द्या. अशाप्रकारे उपवासाचा ढोकळा तयार आहे. आपण हे ढोकळे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करून शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चवीला टेस्टी आणि पचायला हलका! श्रावणी सोमवार स्पेशल उपवासाचा ढोकळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल